

saudi arabia advisory indians stay indoors flight disruptions
esakal
New Delhi: सौदी अरेबियातील परिस्थिती बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने नव्याने सूचना जारी केल्या आहेत. हवाई हल्ला झाल्यास घरातच राहा, सतर्कता बाळगा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या घडामोडींशी संबंधित व्हिडीओ किंवा बातम्या सोशल मीडियावर शेअर करू नका, असेही दूतावासाने म्हटले आहे. क्षेपणास्त्र हल्यामुळे सौदीतील विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे.