सौदी अरेबियानं 15 वर्षांनंतर 'रमजान'साठी बदलले नियम; जाणून घ्या नेमकं कारण I Saudi Arabia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saudi Arabia Ministry of Education

सौदी अरेबियाच्या शिक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय.

सौदी अरेबियानं 15 वर्षांनंतर 'रमजान'साठी बदलले नियम

सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) शिक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. रमजानमध्ये (Ramadan) शाळा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे, तसा आदेशही त्यांनी काढलाय. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळं देशातील अनेक नागरिक संतप्त झाले आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये एक शालेय विद्यार्थी शिक्षण मंत्री डॉ. हमद अल-अशेख यांना रमजानमध्ये शाळा बंद ठेवण्यास सांगत आहे. सौदी अरेबियामध्ये 15 वर्षांनंतर रमजानमध्ये शाळा सुरू ठेवल्या जात आहेत.

सौदी अरेबियामध्ये दोन सेमिस्टरऐवजी आता तीन सेमिस्टरचे शैक्षणिक (Saudi Arabia Schools) वर्ष सुरू झालं आहे. याबाबत, सौदी अरेबियातील विद्यार्थ्यांना ईदच्या 12 दिवसांच्या सुट्टीच्या आधी महिन्याचे 24 दिवस शाळेत यावं लागेल, असं जाहीर करण्यात आलंय. रमजान सुरू होण्यापूर्वी सौदीच्या शिक्षण मंत्रालयानं शाळा सुरू करण्याबाबत आणि शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत माहिती दिली होती. मंत्रालयानं सांगितलं होतं की, शाळा सकाळी 9 ते 10 दरम्यान सुरू होतील आणि प्रत्येक वर्गाची वेळ 35 मिनिटांची असणार असल्याचं जाहीर केलं होतं.

हेही वाचा: CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही : राहुल गांधी

मात्र, शाळा कधी सुरू होणार हे ठरवण्याचा अधिकार मंत्रालयानं (Saudi Arabia Ministry of Education) सर्व शिक्षण विभागांना दिलाय. मंत्रालयानं आपल्या घोषणेमध्ये म्हंटलंय, विद्यार्थ्यांसाठी ईद-उल-फितरची सुट्टी 26 एप्रिलपासून सुरू होईल. दरम्यान, एका विद्यार्थ्यानं सौदीच्या शिक्षणमंत्र्यांना रमजान महिन्यापासून शाळा सुरू करण्याबाबत प्रश्न केलाय. त्यानंतर सोशल मीडियावर शाळा बंद करण्याच्या चर्चेला उधाण आलंय. आता सौदीचं शिक्षण मंत्रालय कोणता निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Saudi Arabia Education Ministry Has Changed The Rules For Ramadan After 15 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..