esakal | कोविड-19ला  हरवणं आता शक्य! मिळालं आतापर्यंतच सर्वात प्रभावी औषध
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

कोरोना महामारीविरोधातील हे एक मोठं यश मानलं जात आहे.या औषधाची चाचणी ब्रिटेनमधील वैज्ञानिकांनी घेतली आहे.वैज्ञानिकांनुसार, डेक्सामेथासोन औषधाचा वापर गंभीर असलेल्या रुग्णांवर प्राथमिकतेने करायला हवा.

कोविड-19ला  हरवणं आता शक्य! मिळालं आतापर्यंतच सर्वात प्रभावी औषध

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन- कोरोना महामारीने थैमान घातले असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लंडनमधील शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या एका प्रवाभी औषधाची ओळख झाली आहे. जेनेरिक स्टेरॉयड डेक्सामेथासोन (Dexamethasone) असं या औषधाचं नाव आहे. विशेष म्हणजे हे औषध सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने मोठ्या प्रमाणात या औषधाचा वापर केला जाऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेक्सामेथासोन हे औषध कोविड-19 मुळे गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना दिल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण एक तृतीयांशने कमी होते. तसेच वेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण एक पंचमाशने कमी होते असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना महामारीविरोधातील हे एक मोठं यश मानलं जात आहे. या औषधाची चाचणी ब्रिटेनमधील वैज्ञानिकांनी घेतली आहे. वैज्ञानिकांनुसार, डेक्सामेथासोन औषधाचा वापर गंभीर असलेल्या रुग्णांवर प्राथमिकतेने करायला हवा. 

कोरोनाबाधित रुग्ण जे वेंटिलेटर किंवा ऑक्सीजनवर आहेत, अशांना डेक्सामेथासोन दिले गेल्यास त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो. तसेच हे अगदी कमी खर्चात होऊ शकते, असं या किनिकल प्रयोगाचे नेतृत्त करणारे ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाचे प्रोफेसर मार्टिन लैंड्रे यांनी  म्हटलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेस्कोमेथासोन हे शरिरावरील सूज कमी करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य स्टेरॉयड आहे. हे कोविड-19 वर एक प्रवाभी औषध असून यामुळे मृत्यू दर मोठ्या प्रमाणात कमी होतो. हे सर्वात मोठं यश असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. तसेच ब्रिटनचे स्वास्थ्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी ब्रिटनमधील कोरोना बाधितांना तात्काळ डेक्सामेथासोन देण्याच्या सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत. 

राजनाथ सिंह म्हणाले चीनला जशास तसं उत्तर देणार?  

ब्रिटनमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून या औषधाची चाचणी घेतली जात होती. जवळपास 5 हजार रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला असून यातून खूप चांगले निकाल दिसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. शिवाय या औषधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु झाले आहे. कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून अनेक औषधं चर्चेत आले आहेत.

हायड्रोक्लोरोक्वीन, रेमेडिसेवेर या औषधांना कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरले जात होते. मात्र, हायड्रोक्लोरोक्वीनमुळे रुग्णांच्या शरिरावर विपरीत परिणाम पडत असल्याने त्याचा वापर थांबवण्यात आला आहे. मात्र, डेक्सामेथासोनमुळे नव्या आशा निर्माण झाल्या असून हे औषध जीवनदायी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोविड-19 वर अद्यापतरी कोणताही स्वीकृत उपचार किंवा लस नाही. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4 लाखांपेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत.

loading image
go to top