वैज्ञानिकांनी सांगितला कोविड-19 लक्षणांचा क्रम; मिळू शकते मोठी मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

अमेरिकी संशोधकांनी मानसांवरील कोविड-19 लक्षणांचा क्रम उलगडला आहे

न्यूयॉर्क- अमेरिकी संशोधकांनी मानसांवरील कोविड-19 लक्षणांचा क्रम उलगडला आहे. यानुसार कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सर्वात आधी ताप येतो, त्यानंतर सर्दी, खोकला येतो, मांसपेशी दुखायला लागतात त्यानंतर मळमळ किंवा उलटी आणि अतिसार होऊ लागतो. कोविड-19 च्या लक्षणांचा हा क्रम समजल्याने फायदा होऊ शकतो. रुग्णांना तात्काळ मदत करण्यासाठी किंवा स्वत: विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेण्यासाठी याची मदत होऊ शकते. 

देशाची लोकसंख्या 2 कोटी 38 लाख; कोरोना रुग्ण फक्त 481

फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ नावाच्या पत्रिकेने शोध निबंध प्रकाशित केला आहे. या शोध निबंधानुसार, लक्षणांचा क्रम जाणून घेतल्याने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी योजना बनवताना मदत होईल. त्यामुळे या आजाराला सुरुवातीच्या काळात नियंत्रणात आणले जाऊ शकते. अमेरिकेच्या दक्षिणी कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचे शोध निबंधाचे लेखक पीटर कुन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विषाणूचा मानवावर होणाऱ्या लक्षणांचा क्रम जाणून घेणे मदतीचे ठरु शकते. कोविड-19 लक्षणांसारखेच साध्या तापाचे लक्षणे असतात. त्यामुळे लक्षणांचा क्रम लक्षात आल्यास आपल्याला फरक करता येऊ शकतो, असं ते म्हणाले आहेत. 

कोविड-19 आजाराच्या लक्षणांचा क्रम लक्षात आल्याने नवा दृष्टिकोण मिळाला आहे. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसल्यास रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करु शकतो, असं शोध निबंधाचे एक लेखक जोसेफ लार्सन म्हणाले आहेत. ताप आणि खोकला विविध प्रकारच्या श्वसनासंबधी आजाराशी जुडलेला असतो. यात मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मर्स) आणि सार्स यासारखे आजार सामील आहेत. असे असले तरी लक्षणांच्या क्रमावरुन कोविड-19 ची ओळख केली जाऊ शकते, असं ते म्हणाले आहेत. 

कोरोनाविरोधात लढाई जिंकणारे जगातील नऊ देश!

वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, वरील गेस्ट्रोइनेस्टाइनल ट्रैक्ट (मळमळ/ उलटी) आणि खालील  गेस्ट्रोइनेस्टिनल ट्रैक्ट ( अतिसार) ने प्रभावित होऊ लागतात. हे कोविड-19 ची लक्षणे आहेत. ही लक्षणे मर्स आणि सार्सपेक्षा वेगळे आहेत. संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या चीनमधील 55,000 पेक्षा अधिक कोरोना प्रकरणातील लक्षणांचा अभ्यास करत ही भविष्यवाणी केली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी यावर अभ्यास सुरु केला आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scientist said about corona virus symptoms sequence