esakal | हाँगकाँगमधून जीव वाचवून अमेरिकेत आलेल्या वैज्ञानिकाचा चीनबाबत धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना विषाणूबद्दल माहिती लपवल्यावरुन चीनवर चौफर टीका होत आहे. हॉंगकाँगमधून आपला जीव वाचवून अमेरिकेत पळून गेलेल्या एका वैज्ञानिकाने मोठा खुलासा केला आहे

हाँगकाँगमधून जीव वाचवून अमेरिकेत आलेल्या वैज्ञानिकाचा चीनबाबत धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगात 1.20 कोटी लोक बाधित झाले आहे, तर 6 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात कोरोना विषाणूबद्दल माहिती लपवल्यावरुन चीनवर चौफर टीका होत आहे. हॉंगकाँगमधून आपला जीव वाचवून अमेरिकेत पळून गेलेल्या एका वैज्ञानिकाने मोठा खुलासा केला आहे. चीनला कोरोना विषाणूबाबत फार पूर्वीपासूनच माहित होत, पण चीनने ही माहिती जगापासून लपवली. शीर्ष पातळीवरुन ही गोष्ट झाल्याचं धक्कादायक खुलासा वैज्ञानिकाने केला आहे.

'कोरोना व्हायरस हे 100 वर्षांतील सर्वांत वाईट संकट'
हाँगकाँग स्कूलमधील वायरोलॉजी आणि इम्यूनोलॉजीच्या विशेषज्ञ ली-मेंग यान यांनी शुक्रवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. कोरोना महामारीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा चीनचे संशोधक आणि अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. चीनच्या चुकीमुळे आज लाखो लोकांचा जीव जात आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत. 

यान या कोरोना विषाणूवर अभ्यास करणाऱ्या सुरुवातीच्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत. चीनने विदेशी आणि हाँगकाँगच्याही काही वैज्ञानिकांना या संशोधनात समावेश करण्यास नकार दिला होता. शिवाय सुरुवातीला या विषाणूबद्दल उघडउघड बोलणारे चिनी वैज्ञानिक एकदम गप झाले. ते यावर काहीही बोलायचं टाळू लागले. वुहानच्या वैज्ञानिक आणि डॉक्टरांना गप करण्यात आले, असं यान म्हणाल्या आहेत.

चीनची चौफेर कोंडी करण्यासाठी भारताने आखलाय मास्टर प्लॅन
डॉक्टर आणि वैज्ञानिक यावर काही बोलत नव्हते. मात्र, सर्वांनी मास्क वापरणे सुरु केलं होतं. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला. मला परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात येताच मी तेथून निघण्याचा निर्णय घेतला. कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपासून वाचून 28 एप्रिलला मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसले, असं यान यांनी सांगितलं.

यान जेव्हा निघाल्या तेव्हा त्यांच्याकडे फक्त पासपोर्ट आणि पर्स होता. बाकी सर्व सामान त्यांनी मागे सोडलं होतं. जर त्या पकडल्या गेल्या असत्या, तर त्यांना तुरुंगात टाकलं गेलं असतं किंवा त्यांना गायब करण्यात आलं असतं. आताही यान यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी आता वापस जाऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.