esakal | मोठी बातमी! वॅक्सीन शिवाय कोरोनाला हरवण्यासाठी वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

scientists develop catch and kill air filter effective for coronavirus

वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूला मारणारे एअर फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे. या एअर फिल्टरमध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यास तो मरुन जातो, त्यामुळे बंद जागेतील त्याचा प्रसार रोखला जाईल, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी! वॅक्सीन शिवाय कोरोनाला हरवण्यासाठी वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन- वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूला मारणारे एअर फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे. या एअर फिल्टरमध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यास तो मरुन जातो, त्यामुळे बंद जागेतील त्याचा प्रसार रोखला जाईल, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. हे एअर फिल्टर शाळा, रुग्णालये, विमानतळ आणि इतर वाहतुकीच्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र मिळाल्याचं बोललं जात आहे.

चांगली बातमी! कोरोनावरील लस निर्मितीसाठी अमेरिकेने खजिना केला खुला
जर्नल मटेरिअल टुडे फिजिक्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हे फिल्टर 99.8 टक्के कोरोना विषाणूला सिंगल पासमध्ये मारुन टाकते. या फिल्टरमध्ये निकेल फोमला 200 डिग्रीपर्यंत तापवले जाते. त्यामुळे सर्व प्रकारचे विषाणू यात मारले जातात. कोरोना विषाणू हवेमध्ये 70 डिग्री तापमानाला जिवंत राहु शकत नाही. त्यामुळे एअर फिल्टरमध्ये तापमान 200 डिग्रीपर्यंत वाढवून विषाणूनला तात्काळ मारले जाते.

विमानतळ, विमान, कार्यालये, शाळा अशा ठिकाणी एअर फिल्टरचा वापर करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो, असं अमेरिकेतील ह्युस्टन विद्यापीठातील अभ्यासक झिफेंग रेन यांनी म्हटलं आहे. फिल्टरची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची क्षमता समाजासाठी महत्वाची ठरु शकते. शाळा, वाहतुकीची ठिकाणी, रुग्णालय आणि कार्यालये याठिकाणी हे एअर फिल्टर प्राधान्याने पुरवण्यात येतील, असं फिल्टर निर्मितीच्या कामात गुंतलेल्या कंपनीने म्हटलं आहे.

नेहरुंच्या लडाख भेटीचा दाखला देत शरद पवार म्हणाले, 'PM मोदींनी...'
निकेल फोम एअर फिल्टरमध्ये महत्वाची भूमिका बजावते. हे सछिद्र असल्याने यातून हवा ये-जा करु शकते. निकेल फोम विद्युत वाहक असल्याने ते तापते. शिवाय एअर फिल्टरमधून बाहेर पडणाऱ्या हवेचे तापमान कमी केले जाते. त्यामुळे याचा वापर एअर कंडिशनींग सारखा केला जाऊ शकतो. घरामध्ये किंवा बंद ठिकाणी एअर फिल्टर प्रभावी ठरु शकते. सध्याचा कोरोना विषाणू किंवा भविष्यात उद्भवू शकणाऱ्या महासाथींना यामुळे अटकाव केला जाऊ शकतो, असं अभ्यासगटाचे सदस्य फैसल चीमा म्हणाले आहेत. 

दरम्यान, कोरोनामुळे जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत. अशावेळी अत्यावश्यक ठिकाणी एअर फिल्टरचा वापर करुन कामाला पुन्हा सुरुवात केली जाऊ शकते.