शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

रशियातील शास्त्रज्ञांना पूर्व सायबेरियातील याकुत्स्क प्रातांत एका श्वानाचे शव सापडले असून ते तब्बल 18 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

मॉस्को : रशियातील शास्त्रज्ञांना पूर्व सायबेरियातील याकुत्स्क प्रातांत एका श्वानाचे शव सापडले असून ते तब्बल 18 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अनेक वर्षांपासून हे शव बर्फात असल्यामुळे या श्वानांच्या शरीर बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे.

मात्र, सर्वसामान्य श्वानांपेक्षा या श्वानाचे शरीर अत्यंत वेगळे असल्याने शास्त्रज्ञ अचंबित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात केस, सूळ्यासारखे दात अशाप्रकारे लांडग्याच्या शरीराप्रमाणे आकाराने मात्र छोट्या असल्याने या श्वानाबद्दल शास्त्रज्ञ संशोधन करत आहे.

शास्त्रज्ञांनी या श्वानाला "डॉगर' असे नाव दिले आहे. स्वीडनमधील काही शास्त्रज्ञांनी या श्वानाच्या डीएनएचा अभ्यास केला असता 18 हजार वर्षांपूर्वी त्याचा जन्म झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र, या टेस्टमधून तो नक्की श्वान आहे की लांडगा हे मात्र कळालेले नाही. 

web title : Scientists found about 18 thousand years old dogs


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientists found about 18 thousand years old dogs