भारतीय वंशाच्या सातजणांवर इनसाईडर ट्रेडिंगचा आरोप

व्यवहारांमधून त्यांनी लाखो डॉलर नफा कमावल्याचा आरोप
Seven computer engineers of Indian descent have been charged with insider trading
Seven computer engineers of Indian descent have been charged with insider tradingsakal

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या सात संगणक अभियंत्यांविरुद्ध इनसाईडर ट्रेडिंग केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या व्यवहारांमधून त्यांनी लाखो डॉलर नफा कमावल्याचा आरोप आहे.

हरीप्रसाद सुरे, लोकेश लगुडू व छोटू प्रभा तेज पुलगम हे तिशीतील तरूण सॅनफ्रान्सिस्कोच्या ट्विलिओ या क्लाऊड काँप्युटिंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. हरीप्रसाद याने कंपनीतील अंतर्गत आर्थिक माहिती आपला मित्र दिलीपकुमार रेड्डी याला दिली व त्याने शेअरबाजारात ट्विलिओ च्या ऑप्शनचे व्यवहार केले. लोकेश यानेही आपली मैत्रीण साई व मित्र अभिषेक धर्मापुरीकर याला कंपनीच्या माहितीवरून टिप दिल्या. छोटूप्रभा तेज यानेही आपला भाऊ चेतन याला टिप दिल्या. याबाबत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन मार्फत या सर्वांवर आरोप ठेवण्यात आले.

ट्विलिओच्या २०२० मधील पहिल्या तिमाहीचे निकाल मे महिन्यात जाहीर झाले. या तिघांना कंपनीची आर्थिक स्थिती या तिमाहीत सुधारल्याचे कळले होते. त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या मित्रांना या टिप दिल्या व त्यांनी हे व्यवहार केले. कोविडचा फैलाव होत असल्याच्या परिस्थितीत कंपनीच्या ग्राहकांनी कंपनीच्या उत्पादनांचा व सेवेचा वापर वाढवल्याचे या तिघांना मार्च महिन्यातच कळले होते. त्यामुळे हे निकाल जाहीर झाल्यावर कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढणार हे देखील त्यांना कळले होते, यातूनच हे गैरप्रकार झाले. अशाप्रकारे व्यवहार करण्यास प्रतिबंध असूनही या तिघांनी आपल्याकडील गोपनीय माहितीचा वापर या व्यवहारांसाठी केला, असा आरोप ठेवला आहे.

इनसाईडर ट्रेडिंग

शेअरबाजारात नोंदविलेल्या कंपनीची अंतर्गत माहिती ज्यांना ठाऊक असते त्यांना त्यानुसार त्या कंपनीच्या शेअरचा भाव वरखाली होणार का याचा अंदाज असतो. त्यामुळे त्या माहितीचा वापर करून ती माहिती जाहीर होण्यापूर्वीच त्या कंपनीच्या शेअरचे व्यवहार केल्यास त्याला इनसाईडर ट्रेडिंग म्हणतात. कायद्याने असे करण्यास प्रतिबंध आहे. या गैरप्रकारातही या तिघांनी हा व्यवहार इतरांना कळू नये म्हणून तेलुगू भाषेचा वापर केला होता, असेही आरोपात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com