
काबूल- अमेरिकेने काबूलमध्ये दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक केला होता. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इस्लामिक स्टेटचे दहशतवादी काबुल एअरपोर्टवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांनी ड्रोन हल्ला केला. दुसरीकडे, एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात अनेक अफगाण नागरिकांसह लहान मुलांचा जीव गेला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट-खुरासानला लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच परिवारातील नऊ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. हल्लात आणखी एक घर उद्धवस्त झालं आहे. (International Latest News)
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या एका नातेवाईकाने सीएनएनला ही माहिती दिली आहे. नातेवाईकाने सीएनएनच्या स्थानिक पत्रकाराला सांगितलं की, 'मृत्यू झालेल्यांमध्ये एक चार वर्षाचा, एक तीन वर्षांचा आणि दोन मुलं दोन वर्षाचे होते. मृत्यू झालेले सर्व लोक एका सामान्य घरातील होते. त्यांचा इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेशी कोणताही संबंध नव्हता.' हा धक्कादायक मीडिया रिपोर्ट समोर आल्यानंतर अमेरिकेने म्हटलंय की, 'हल्लात सामान्य नागरिक मारले गेलेत का? याचा तपास केला जाईल. असं झालं असेल तर याचं आम्हाला दु:ख असेल.'
अमेरिकेचे सेंट्रल कमांडचे प्रवक्ता कॅप्टन बिल अर्बन यांनी म्हटलं की, काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट खुरासान दहशतवादी संघटनेचा धोका संपवण्यासाठी एका वाहनावर ड्रोन हल्ला करण्यात आला. अर्बन यांनी म्हटलं की, वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं होते, त्यामुळे त्याचा मोठा स्फोट झाला आहे. अमेरिकेने स्वरक्षणासाठी हा हल्ला केला आहे. या हल्लामुळे हमिद करजाई या आंतरराराष्ट्रीय हवाई हल्ल्यावरील धोका टळला आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही लक्ष्याला यशस्वीपणे लक्ष्य केलंय.
अफगाणिस्तान मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात कमीतकमी चार मुलांचा मृत्यू झालाय. दोन वाहनं आणि एका घराचे नुकसान झाले आहे. अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत सैन्य वापसीची घोषणा केली आहे. त्याआधी हा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने सांगितलं की, तालिबानने विदेशी लोकांना देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. 31 ऑगस्टनंतर तालिबान विमानतळावर नियंत्रण मिळवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.