कोरोनानंतर आता चीनमध्ये पुन्हा नवे संकट; 141 जणांचा मृत्यू

कृपादान आवळे
मंगळवार, 14 जुलै 2020

22 लाखांपेक्षा अधिक जणांचा बचाव

- आपत्तीत मोठे नुकसान

बीजिंग : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याची सुरुवात चीनमधून झाल्याचे वृत्त आल्यानंतर चीनच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा प्रकार सुरु झाला आहे. तसेच कोरोनाचे संकट थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत त्यानंतर आता चीनमध्ये पावसाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. चीनमध्ये मुसळधार पाऊस पडला असून, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चीनमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती झाल्याचे वृत्त असल्याने जगभरातून चीनवर टीका केली जात आहे. जगातील बहुतांश देश कोरोना संकटाच्या वेढ्यात आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यानंतर आता चीनला मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. या मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी पूरस्थिती निर्माण होत आहे. या पुरात आत्तापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये अनेकजण बेपत्ता झाले आहेत. 

Heavy Rains

आपत्तीत मोठे नुकसान

चीनमध्ये निर्माण झालेल्या या आपत्तीमध्ये आतापर्यंत जवळपास 3.8 कोटी लोकांना याचा फटका बसला आहे. तसेच चीनमधील सुमारे 27 प्रांतांना या आपत्तीचा सामना करावा लागत आहे. या आपत्तीमध्ये अनहुई, जिआंग्सी, हुनान आणि हुबेई प्रांतांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

22 लाखांपेक्षा अधिक जणांचा बचाव

भूस्खलन आणि पुरामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत सुमारे 22 लाखांपेक्षा अधिक जणांना वाचविण्यात यश आले आहे. 

अनेक नद्यांना पूर

गेल्या अनेक आठवड्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यांगत्सीसह अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे 28 हजारांपेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या आहेत आणि सुमारे 11.7 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पूर नियंत्रण व दुष्काळ निवारण कार्यालयाने दिली.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

यांग्त्जी व हुइहे नदीबरोबरच डोंगिंग, पोयांग आणि तैहू तलाव यांनी सोमवारपर्यंत धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तसेच तांगशानमध्ये 5.1 तीव्रतेचा भूकंपही झाला.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Severe floods in China leave over 38 million affected 141 dead