आधी भावासाठी जेलमध्ये... आणि आता थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर दावा!

Shahbaz Sharif
Shahbaz Sharif

पाकिस्तानात नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पंतप्रधान इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागलं आहे. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` खालसा झाली. (Imran Khan Loses No Confidence Motion in Pakistan Assembly)

अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटवले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यानंतर पाकिस्तानची सूत्र कोणाच्या हाती जाणार हा प्रश्न आहे. यात मुस्लीम लीगचे नेते शाहबाज शरीफ यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. (Pakistan Political Crisis)

Shahbaz Sharif
इम्रानशाहीचा खालसा! मध्यरात्री पाकिस्तानातील सरकार पडलं

पाकिस्तानातील मुस्लीम लीग नवाज (PMLN) नेते शाहबाज शरीफ देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. शनिवारी मध्यरात्रीनंतर देशात नवे राजकीय समीकरण तयार झालंय. यानंतर शरीफ याचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी गेल्या बुधवारी म्हटले होतं की, विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ लवकरच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. शनिवारी रात्री इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नॅशनल असेंब्लीत शाहबाज शरीफ यांनी अतिशय संतुलित भाषण केलं. यामध्ये त्यांनी देशात नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. आणि इम्रान खान यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Shahbaz Sharif
शाहबाज शरीफ कोण आहेत? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत

शाहबाज शरीफ यांनी देशात कायद्याचे राज्य आणि संविधान चालवण्याची भाषा केली आहे. त्यांनी बिलावल भुट्टो झरदारी आणि मौलाना फजलुर रहमान यांच्यासोबत सत्ता चालवण्याचा दावा केला आहे. लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. यानंतर शरीफ सभागृहात आपला बहुमताचा दावा राष्ट्रपतींसमोर समर्थक खासदारांच्या पत्रासह मांडणार असल्याचं बोललं जातंय. यानंतर ते देशात नवीन सरकार स्थापन करण्याची परवानगी मागण्याची शक्यता आहे.

या औपचारिकतेनंतर शाहबाज शरीफ मंत्रिमंडळाच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. ते सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. अशा परिस्थितीत शाहबाज शरीफ कोण आहेत आणि ते पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठा चेहरा बनल्याचं चित्र आहे.

शरीफ कुटुंबाचे वारस म्हणून ओळखले जातात

शाहबाज त्यांच्या सरळ आणि कठोर प्रशासकीय शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी चीनसोबत त्यांच्या वैयक्तिक पातळीवर संबंध विकसित केले आहेत. यावनंतर अनेक प्रकल्प देखील मार्गी लावले. त्यांचे अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे अमेरिकेत सत्तेचा समतोल राखणारे ते सध्या महत्वाचे नेते आहेत.

पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शाहबाज यांना पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज (PML-N) ने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. मात्र, त्यानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

शाहबाज शरीफ यांचे पूर्ण नाव मियां मुहम्मद शाहबाज शरीफ आहे. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोरमध्ये झाला. मोठा भाऊ नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. सध्या शाहबाज हे पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

शाहबाज हे नवाझ शरीफ यांचे भाऊ

शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. सध्या ते पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षाचे नेते आहेत. शाहबाज यांचा जन्म लाहोर, पंजाब, पाकिस्तान येथे एका पंजाबी भाषिक काश्मिरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद शरीफ असून ते उच्च-मध्यमवर्गीय व्यापारी आणि उद्योगपती होते. त्यांचे कुटुंब काश्मीरमधील अनंतनाग येथून व्यवसायासाठी आले होते आणि अमृतसर गावात स्थायिक झाले होते. पण फाळणीनंतर शाहबाजचे आई-वडील अमृतसरहून लाहोरला गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com