वडिलांनी गाडीला बांधून तिला नेले शाळेत..

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

युंफू (चीन) : लहानपणी सगळेच शाळेत जाण्यासाठी कुरकुर करतात. आई-वडिलांना जबरदस्ती करून मुलांना शाळेत पाठवायला लागते. अनेकदा आई-वडिल आवडीच्या पदार्थांचे, खेळण्याचे आमिष दाखवून मुलांना शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करतात. पण काही मुले कितीही आमिषे दाखवली तरी शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. 

अशाच एका हट्टी व शाळेत जाण्यास तयार नसलेल्या मुलीला शाळेत पाठविण्यासाठी तिच्या वडिलांनी भन्नाट प्रकार करून तिला शाळेत सोडले. ही मुलगी कायमच शाळेत जाण्यास नकार देत होती. एक दिवस तिच्या वडिलांनी रागात तिला दुचाकीच्या मागच्या सीटला दोरीने बांधले व शाळेत नेले. तिचे हात-पाय गाडील बांधून तिला शाळेत सोडले. यावेळी ती मुलगी जोरजोरात रडत होती. पण तिचे काहीही न ऐकता तिला वडिलांनी शाळेत सोडले. 

या प्रकाराबाबत, पोलिसांनी या वडिलांना पकडले, पण फक्त खडे बोल सुनावून सोडून दिले. या घटनेचा व्हिडीओ चीनमधील एका माध्यमाच्या संकेतस्थळावरून सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नेटीझन्स थक्क झाले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She Refused To Go To School So Dad Tied Her Onto Bike