

Sheikh Hasina
sakal
New Delhi: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून भारतात राजकीय आश्रय घेतला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी भारतात राजकीय आश्रय घेतला होता. सध्या त्या दिल्लीतील एका सुरक्षित ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी त्यांच्या निवासस्थानाचा नेमका पत्ता सार्वजनिक करण्यात आलेला नाही.