Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या परतीची एवढी भीती का? गोपालगंजमध्ये 'लॉकडाऊन'सारखी स्थिती, ट्रेन बंद अन् फंड केला फ्रीज

Sheikh Hasina Return Bangladesh Gopalganj Lockdown ICJ Warning: भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आधीच संवेदनशील टप्प्यावर असताना पाकिस्तानमधून आलेल्या या विधानाने प्रादेशिक राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे.
Sheikh Hasina return Bangladesh

Sheikh Hasina return Bangladesh

esakal

Updated on: 

Gopalganj lockdown Bangladesh: बांगलादेशमध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा अत्यंत स्फोटक बनले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संभाव्य परतीच्या शक्यतेने देशातील तणाव वाढला आहे. एकीकडे त्यांच्या अवामी लीग पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने करत आहेत, तर दुसरीकडे तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकारने हसीना यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोपालगंज जिल्ह्याला छावणीचे स्वरूप दिले आहे. या जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झालीए.

Loading content, please wait...