esakal | भयानक घटना!! डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा रूग्णाला बसला मोठा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा रूग्णाला बसला मोठा फटका

sakal_logo
By
शर्वरी जोशी

माणसातील देव म्हणजे डॉक्टर असं अनेकदा म्हटलं जातं. वेळ-काळ प्रसंग कशाचीही तमा न बाळगता डॉक्टर सदैव रुग्णांच्या मदतीसाठी हजर असतात. परंतु, अनेकदा कामाचा गडबडीत किंवा ताण-तणावामुळे त्यांच्याकडूनही काही चुका घडतात. अशीच एक चूक ऑस्ट्रियामधील डॉक्टरांकडून घडली आहे. रुग्णाच्या डाव्या पायावर (leg) शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्यांनी चक्क उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे सध्या या रुग्णालयात चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. (shocking doctors mistakenly amputated wrong leg)

हेही वाचा: VIDEO: कोरोनावर मात केल्यानंतर टुथब्रश का बदलावा?

ऑस्ट्रियामधील फ्रिस्टँड क्लिनिकमध्ये एक ८२ वर्षीय वृद्ध व्यक्ती त्यांच्या पायाची तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या डाव्या पायामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. यावेळी पायाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी डाव्या पायाऐवजी चक्क उजवा पाय कापला. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी नर्स या रुग्णाच्या पायाचं ड्रेसिंग करायला आली त्यावेळी झालेली चूक तिच्या लक्षात आली.

दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर या नर्सने क्लिनिकच्या उच्च अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाने आपली चूक मान्य करत संबंधित रुग्णाला नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे.