कोरोनाविरोधात वैश्‍विक एकजूट दाखवा : गुटेरस

पीटीआय
Sunday, 17 January 2021

या साथीचा सामाजिक व आर्थिक परिणाम अत्यंत भयंकर आहे. जगभरात असंख्य जणांच्या नोकऱ्या गेल्या, रोजीरोटी बंद झाली. यामुळे लाखो लोक दारिद्र्यात लोटले गेले, असे ते म्हणाले.

न्यूयॉर्क - कोरोनाव्हायरसच्या साथीत जगभरातील मृतांच्या संख्या २० लाखाच्यावर जाणे, ही बाब अत्यंत हृदयद्रावक आहे. या लाखो मृतांच्या स्मरणार्थ कोरोनाविरोधातील लढ्यात वैश्‍विक एकजूट दाखवावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक पातळीवरील एकत्रित प्रयत्नांच्या अभावामुळे या जागतिक साथीने भयावह रूप घेतले आहे. तसेच विविध सरकारांचा ‘लसीकरणवाद’ म्हणजे स्वयंपराभवास सामोरे जाण्यासारखे असून यामुळे जग कोरोनामुक्त होण्यास विलंब लागत आहे,’’ अशी खंत गुटेरस यांनी शुक्रवारी (ता.१५) व्हिडिओ संदेशाद्वारे व्यक्त केली. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये आढळला. त्यानंतर कोरोनाचा फैलाव जगातील कानाकोपऱ्यात झाला. सुमारे १९१ देश व विभागांत याच्या संसर्गाने मरण पावलेल्यांची संख्या सप्टेंबरमध्येच दहा लाखापर्यंत पोचली. याशिवाय या साथीचा सामाजिक व आर्थिक परिणाम अत्यंत भयंकर आहे. जगभरात असंख्य जणांच्या नोकऱ्या गेल्या, रोजीरोटी बंद झाली. यामुळे लाखो लोक दारिद्र्यात लोटले गेले, असे ते म्हणाले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनावर परिणामकारक ठरेल अशा लसीकरणास जगभरात प्रारंभ झाला असला तरी त्यात विषमता आढळून येत आहे. ही कमी करण्याची जबाबदारी जगातील प्रमुख अर्थसत्तांवर आहे. लसीकरण यशस्वी होत असले तरी त्यात एकजुटीचा अभाव आहे. उच्च उत्पन्न गटातील देशांमध्ये कोरोनावरील लस सहज उपलब्ध होत आहे, मात्र जगातीव गरिब देश त्यापासून दूरच आहेत, अशी चिंता गुटेरस यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show global unity against Coronavirus says Antonio Guterres