
SriLanka: राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर लंकेतील जनतेचा जल्लोष
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक दिवाळखोरीनंतर जनतेचा रोष बघून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर जनतेने टीका करत राष्ट्रपती भवनाची तोडफोड केली होती. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी आपला राजीनामा मेल केला आहे. राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याचं कळताच लंकेतील जनतेने जल्लोष केला आहे.
(SriLanka President Resignation)
दरम्यान, राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्यावर मालदीवमध्ये गेल्याचं समजलं होतं. त्यानंतर ते आता सिंगापूरला गेले असून त्यानंतर ते सौदी अरेबियाला जाणार आहेत. त्यातच त्यांनी मेल करून संसदेच्या अध्यक्षांना आपला राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर श्रीलंकेतील जनतेने जल्लोष व्यक्त केला आहे. गाणे आणि बँड लावून तरूण नाचताना दिसत आहेत.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड, पण प्राथमिक सुविधांची वाणवा; उच्च न्यायालय म्हणाले...
श्रीलंकेच्या (Sri Lanka) संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी गुरुवारी गोटाबाया राजपक्षे यांना सांगितले की त्यांनी लवकरात लवकर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांना काढून टाकण्यासाठी इतर पर्याय शोधण्यात येईल. या इशाऱ्यानंतर राजपक्षे यांनी गुरुवारी राजीनामा पाठवला. माले, मालदीवमध्ये एक दिवस घालवल्यानंतर राजपक्षे सिंगापूरमध्ये दाखल झाले आहे. यानंतर ते सौदी अरेबियाला जाणार आहेत.
Web Title: Shri Lanka President Rajapaksha Resignation People Rejoiced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..