Viral Video: चिमुकल्याने गाडीच्या खिडकीतून उडी मारली, सिग्नल सुटला अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: चिमुकल्याने गाडीच्या खिडकीतून उडी मारली, सिग्नल सुटला अन्...

काही पालक आपल्या लहान मुलांबाबत सतर्क नसतात किंवा त्यांचे लहान मुलांवर लक्ष नसतं अशा तक्रारी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील पण आपल्या लहान मुलांबाबत काही पालक किती दुर्लक्ष करू शकतात याबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक चारचाकी गाडी सिग्नलला उभी असताना गाडीच्या खिडकीतून एक लहान मुलगा उडी मारतो आणि सिग्नल सुटल्यावर गाडी पुढे जाताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'निष्काळजी करणाऱ्या पालकांची हद्द' असा आशय टाकून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या एक गाडी सिग्नलला उभी असते, त्याचवेळी एक लहान मुलगा एका गाडीच्या खिडकीतून आपले डोके वर काढत असतो पण तेवढ्यात तो खिडकीतून बाहेर उडी मारतो. तेवढ्यात सिग्नल सुटतो आणि गाडी पुढे निघून जाते आणि तो लहान मुलगा रस्तावरच पडलेला असतो.

दरम्यान, ही गाडी पुढे निघून गेल्यावर हा चिमुकला रस्त्यावर असाच रडत बसलेला आहे. त्यानंतर चिमुकल्याला काही लोकांनी उचलून घेतल्याचं पहायला मिळालं आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी कमेंट केल्या असून नेटकऱ्यांनी सदर पालकांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसतंय. परंतु लहान मुलांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून पालकांनी आपापल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

Web Title: Signal Vehicle Window Children Jumped On Road Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsviral video