esakal | पाकिस्तानात हल्ले सुरूच; पेशावरमध्ये शीख डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan: हल्ले सुरूच! पेशावरमध्ये शीख डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

Pakistan: हल्ले सुरूच! पेशावरमध्ये शीख डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पेशावर : पेशावर शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या शीख डॉक्टरची गुरुवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. डॉ. सतनाम सिंग (वय ४५) (खालसा) असे त्यांचे नाव असून गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नाही. सिंग यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले आहेत.

हेही वाचा: "दुसरा डोस घेणाऱ्यांत कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त", कारण...

पेशावर शहरातील शिख समुदायातील प्रसिद्ध सदस्य डॉ. सतनाम सिंग हे चरसद्दा रोडवर युनानी क्लिनिक चालवतात. काल सकाळी हल्लेखोर त्यांच्या केबिनमध्ये घुसले आणि त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. यात सिंग यांना चार गोळ्या लागल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी सतनाम सिंग यांना लेडी रीडिंग हॉस्पिटल येथे नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेनंतर परिसर सील करण्यात आला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

हेही वाचा: अनिल देशमुखांना कोर्टाकडून समन्स जारी, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

पेशावर हे पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असून त्याची सीमा अफगाणिस्तानशी लगत आहे. पेशावर शहरात तब्बल १५ हजार शीख राहतात. त्यातील बहुतांश व्यापारी असून काही जण फार्मसी चालवतात. ४५ वर्षीय सतनाम सिंग हे गेल्या दोन दशकांपासून पेशावर येथे युनानी दवाखाना चालवत होते. स्थानिक नेते हरपालसिंग यांनी हल्ल्याचा निषेध केला असून दोषींना पकडण्याची मागणी केली आहे. फाळणीनंतर हजारो शीख भारतात आले, परंतु असंख्य शीख पाकिस्तानातच थांबले. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात हिंदू शिख आणि ख्रिश्‍चन समुदायावर हल्ले होत आहेत. एवढेच नाही तर अहमदिया आणि शिया मुस्लिमांवरही हल्ले होत आहेत. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री मोहंमद खान यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरवर्षी होताहेत हल्ले

२०१८ मध्ये शिख समुदायाचे आघाडीचे नेते चरणजित सिंग यांची पेशावरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.२०२० मध्ये टिव्ही ॲकर रविंदर सिंग यांचीही हत्या करण्यात आली. २०१६ मध्ये तेहरिक इन्साफचे नेते सोरेन सिंग यांचीही हत्या केली होती.

loading image
go to top