ट्रम्प यांच्या राजवटीत शीख सुरक्षित; शीख फॉर ट्रम्प संघटनेचा दावा

पीटीआय
Wednesday, 30 September 2020

ट्रम्प प्रशासनाच्या राजवटीत अमेरिकेतील शीख समुदाय सुरक्षित असल्याचे ‘शीख अमेरिकी ॲटर्नी ॲड लॉयर्स फॉर ट्रम्प’च्या सह अध्यक्ष हरमित ढिल्लोंन यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन - ट्रम्प प्रशासनाच्या राजवटीत अमेरिकेतील शीख समुदाय सुरक्षित असल्याचे ‘शीख अमेरिकी ॲटर्नी ॲड लॉयर्स फॉर ट्रम्प’च्या सह अध्यक्ष हरमित ढिल्लोंन यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी बहाल केलेल्या धार्मिक स्वातंत्र्यांमुळेच आज अनेक शीख युवक पगडी आणि दाढी राखत अमेरिकी सैनिक सेवेत कार्यरत आहेत, अशी माहिती दिली. मात्र ज्यो बायडेन यांच्या प्रचारात शिख समुदायाचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शीख फॉर ट्रम्पचे सह-अध्यक्ष जसदिप सिंग म्हणाले की, शिख समुदायाच्या मनात अन्य कार्यकाळाच्या तुलनेत डोनाल्ड ट्रम्पच्या काळात अधिक सुरक्षितता वाटत आहे. शिख समुदाय हा एक मजबूत समुदाय असून कोणीही आम्हाला त्रास देऊ शकत नाही. मात्र शिख समुदाय अमेरिकेत सुरक्षित नसल्याचे सांगून ज्यो बायडेन यांच्याकडून मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जसदिप सिंग म्हणाले. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या ‘शीख अमेरिकन्स फॉर बायडेन’च्या नावाने मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी या मोहिमेने काढलेल्या पत्रकात दोन वर्षांत शिखांवरील अत्याचारात सरासरीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. परंतु हा दावा चुकीचा असल्याचे जसदिप सिंग यांनी म्हटले आहे.  ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस हे शीख विरोधी सिद्ध होऊ शकतात, असा दावा सिंग यांनी केला. कमला हॅरिस या कॅलिफोर्नियात ॲटर्नी जनरल म्हणून काम करत असताना त्यांनी शिख समुदायाचे त्रिलोचनसिंग ओबेरॉय यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. हॅरिस यांनी ओबेरॉय यांना दाढी काढण्यास सांगितले होते पण त्यास नकार दिल्याने हॅरिस विरोधात होत्या, असा दाखला जसदिप सिंग यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sikhs are safe under the Trump administration Community leaders