गोटाबया यांचा सिंगापूरचा मुक्काम वाढला

अस्वस्थ श्रीलंका : माजी अध्यक्षांना नव्याने व्हिसा, महिंदांना देश सोडण्यास मनाई
singapore extends gotabaya rajapaksas visit Mahinda Rajapaksa Ban on leaving country
singapore extends gotabaya rajapaksas visit Mahinda Rajapaksa Ban on leaving countrysakal

सिंगापूर : श्रीलंकेची जनता महागाई आणि अन्नधान्यांच्या टंचाईला सामोरे जात असताना माजी अध्यक्ष गोटाबया राजपक्ष सिंगापूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. गोटाबया राजपक्ष हे आज नाहीतर उद्या मायदेशी परततील, असा आशावाद बाळगला जात असताना त्यांचा सिंगापूरचा मुक्काम वाढला आहे. सिंगापूरच्या सरकारने त्यांना नव्याने प्रवासी व्हिसा जारी केला असून यानुसार ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत सिंगापूरमध्ये राहू शकतील. गोटाबया यांच्या सध्याच्या व्हिसाची मुदत संपत आली होती.

राजपक्ष यांच्या व्हिसाचा कालावधी हा ११ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. देशाची आर्थिक स्थिती सावरण्यास गोटाबया राजपक्ष यांना अपयश आल्याने त्यांनी १३ जुलै रोजी श्रीलंकेतून पळ काढला. तेथून ते मालदिवला आणि नंतर सिंगापूरमध्ये दाखल झाले. द स्ट्रेट्स टाइम्सने दिलेल्या वृत्तात गोटाबया यांना नवीन व्हिसा जारी केल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सिंगापूरने गोटाबया यांना चौदा जुलै रोजी खासगी प्रवासाच्या आधारे देशात प्रवेश दिला आणि चौदा दिवसांचा तात्पुरता प्रवासी व्हिसा दिला होता. यादरम्यान, काल विक्रमसिंघे यांच्या सरकारचे प्रवक्ते गुणवर्धने यांनी गोटाबया हे कोठेही लपले नसल्याचे म्हटले होते. ते लवकरच मायदेशी परततील, असा विश्‍वासही व्यक्त केला होता. पण गोटाबया आता ११ ऑगस्टपर्यंत सिंगापूरमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिंदा, बासिल यांना मनाई

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्ष आणि माजी मंत्री बासिल राजपक्ष यांना दोन ऑगस्टपर्यंत देश सोडता येणार नाही, असे आदेश आज श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत देश सोडण्यास मनाई केली होती.

तमिळनाडूकडून मदतीचा हात

तमिळनाडू सरकारने देणगीच्या स्वरूपात दिलेल्या औषधांची तिसरी खेप श्रीलंकेत मंगळवारी दाखल झाली. यात भारत सरकारने अन्नधान्याची मदतीचाही समावेश आहे. भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी आणि आरोग्य मंत्री केहेलिया रामकुक्वेला यांच्या उपस्थितीत भारताने पाठविलेली मदत सुपूर्द करण्यात आली. ३.४ अब्ज रुपयांपेक्षा अधिक मूल्यांची मदत तमिळनाडू सरकारने केली आहे. भारताकडून एकूण दिलेल्या मदतीत ४० हजार मेट्रिक टन तांदूळ, ५०० मेट्रिक टन दूध पावडर, १०० मेट्रिक टन औषधांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com