esakal | सिंगापूरच्या जोडप्यांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज
sakal

बोलून बातमी शोधा

couples

काही दिवसांपुरती सक्तीची बिनपगारी रजा, पगारात कपात अशा असंख्य बॅड न्यूजच्या गर्तेतच गुड न्यूज मिळालेल्या जोडप्यांसाठी सिंगापूर सरकारचा एक निर्णय म्हणजे सोने पे सुहागा ठरला आहे.

सिंगापूरच्या जोडप्यांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सिंगापूर - कोरोनाच्या जागतिक साथीमुळे नोकरी जाणे, काही दिवसांपुरती सक्तीची बिनपगारी रजा, पगारात कपात अशा असंख्य बॅड न्यूजच्या गर्तेतच गुड न्यूज मिळालेल्या जोडप्यांसाठी सिंगापूर सरकारचा एक निर्णय म्हणजे सोने पे सुहागा ठरला आहे.

अशा जोडप्यांवरील आर्थिक ताण हलका व्हावा म्हणून एकाच हप्त्यात विशेष निधी देण्यात येईल. रक्कमेचा तसेच तारखेचा आकडा, अंमलबजावणीचे स्वरूप असा तपशील लवकरच जाहीर होईल.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपपंतप्रधान हेंग स्वी कीट यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संततीसाठी इच्छुक असलेल्या काही पालकांनी ही  योजना कोरोनामुळे लांबणीवर टाकल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अशा  काळात नवजात बाळामुळे होणाऱ्या खर्चाचा भार हलका करण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा उद्देश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आठ वर्षांचा निचांक
मुळातच निचांकी प्रजोत्पादन दर असलेल्या देशांत सिंगापूरचा समावेश होतो. तेथील प्रजोत्पादनाचा दर 2018 मध्ये प्रतिमहिला 1.14 इतका होता. हा आठ वर्षांतील निचांक होता, जो गेल्या वर्षी कायम राहिला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधीचा बेबी बोनस इतका
सिंगापूर सरकार बेबी बोनस म्हणून पात्र पालकांना दहा हजार सिंगापूर डॉलर (7330 डॉलर, पाच लाख 37 हजार 285 रुपये) इतकी रक्कम देतच असते. याशिवाय नवी मदत अतिरिक्त असेल.

loading image