रस्त्याच्या मध्येच भगदाड पडून कोसळल्या 2 कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

हार्पिन (चीन) - आपल्याकडच्या रस्त्यांवर खड्डे असतात त्याला सगळेच वैतागलेले असतात. परंतु, चीनमध्ये तर एका रसत्याला भगदाडच पडले. आणि हे भगदाड एवढे मोठा होते की, दोन कार त्यात पडल्या. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. परंतु, अचानक एवढा मोठा खड्डा कसा पडाला..? यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. 

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे हा प्रकार घडला असावा. हा खड्डा दहा मीटर एवढा लांब असून, 4 मीटर खोल आहे. एका कारच्या चालकाने, काही समजण्याच्या आतच आम्ही खड्यात पडल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कारमधले तिघे जण सुखरुप बाहेर आले असले तरी नक्की असे कशामुळे झाले याची चौकशी सुरु आहे.

हार्पिनमध्ये हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसुन ऑक्टोबर महिन्यातही अशाच प्रकारे एक खड्यात पडली होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Sinkhole Opened Up And Swallowed 2 Cars In China. Luckily, Nobody Was Hurt

टॅग्स