अमेरिका-चीन युद्ध होण्याची भीती; रशियानेसुद्धा सुरू केल्या हालचाली

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 September 2020

अमेरिका आणि चीनमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता रशियानेही आपल्या सैनिकांची तैनाती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मॉस्को- अमेरिका आणि चीनमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता रशियानेही आपल्या सैनिकांची तैनाती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांनी गुरुवारी याबाबत भाष्य केलंय. रशियाच्या क्षेत्रात वाढता तणाव पाहता पूर्वेकडे सैन्यांची संख्या वाढवली जाणार आहे, असं ते म्हणाले आहेत. पूर्व चिनी सागरातील रशियाच्या व्लादिवोस्तोक ठिकाणावर रशियन सैनिकांची संख्या वाढवली जाणार आहे. या ठिकाणावरुन रशिया प्रशांत महासागर, पूर्व चीन सागर आणि फिलीपीन्सच्या आखाती क्षेत्रावर आपले लक्ष ठेवतो.

पाणी आणि विज बिलात 50 टक्क्यांची सुट; जम्मू-काश्मीरसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, सर्गेई शोइगू म्हणाले की पूर्व क्षेत्रात तणाव वाढल्याने सैनिकांची तैनाती वाढवली जात आहे. सर्गेई यांनी यावेळी कोणत्याही देशाते नाव घेतले नाही. त्यांनी आपल्या वक्तव्यात येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाचा उल्लेख केला, पण प्रत्यक्षपणे कोणतही वक्तव्य केलं नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चीनला लागून असलेली सीमा आणि प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये वाढत्या तणावामुळे रशिया चिंतीत आहे. रशिया आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी या क्षेत्रात सैनिकांची संख्या वाढवत आहे. 

मॉस्कोच्या कार्नेगी सेंटरचे विश्लेषक अॅलेक्झॅंडर गब्यूव यांनी सांगितलं की, संघर्ष सुरु झाला तर या क्षेत्रात आपली लष्करी क्षमता पुरशी असावी, याची रशिया खात्री करत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये अमेरिका आणि चीनच्या नौदलात संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत रशिया केवळ प्रेक्षक होऊ शकत नाही. त्यामुळे रशियाही आपली तयारी करत आहे. रशिया आपल्या तिन्ही दलाला तयार करत आहे. 

आंदोलकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यालाही सोडलं नाही- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका आणि चीनला रशिया दाखवू पाहतंय आपली ताकद

पूर्व क्षेत्रात सैनिकांनी तैनाती वाढवून रशिया आपली ताकद चीनला आणि अमेरिकेला दाखवू पाहात आहे. एकीकडे रशिया आपल्या पारंपरिक शत्रू अमेरिकेला थेट संदेश देत आहे, दुसरीकडे व्लादिवोस्तोक शहरावर चीनने केलेल्या दाव्याबाबत रशिया आक्रमकपणा दाखवत आहे. अमेरिका जपानच्या मदतीने आपली सैन्य उपस्थिती या भागात वाढवत आहे. अमेरिकेने आपली जहाजे दक्षिण चिनी समुद्र आणि पूर्व चिनी समुद्राच्या फेऱ्या मारत आहे. त्यामुळे चीन आणि रशिया सतर्क झाले आहेत. 

रशियाच्या पूर्व भागात मोठ्या काळापासून राष्ट्रपती व्हादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. चिनी सीमेजवळील खाबरोवस्क शहर या आंदोलनाचे केंद्र बनले आहे. एका स्थानिक नेत्याच्या अटकेमुळे या भागात निदर्शने होत आहेत. अशात हे आंदोलन चिरडण्यासाठी रशियन सैन्य वापरले जाऊ शकते. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation of conflict in the US China Russia increased its military presence in the region