Snowstorm hit to america
sakal
ग्लोबल
Snowstorm in America : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा! शेकडो विमान उड्डाणे रद्द; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित
अमेरिकेतील न्यू मेक्सिको ते न्यू इंग्लंडपर्यंतच्या टप्प्याला मोठ्या शीत वादळाचा बसला तडाखा.
ओक्लाहोमा सिटी - अमेरिकेतील न्यू मेक्सिको ते न्यू इंग्लंडपर्यंतच्या टप्प्याला मोठ्या शीत वादळाचा तडाखा बसला असून त्यामुळे शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या वादळाच्या अमेरिकेच्या ४० टक्क्यांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे.
