दुसऱ्या महायुद्धावेळी सैनिकानं आईला पाठवलं पत्र; 77 वर्षांनी मिळालं पण...|Letter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Letter

दुसऱ्या महायुद्धावेळी सैनिकानं आईला पाठवलं पत्र; 77 वर्षांनी मिळालं पण...

एका अमेरिकन सैनिकाने (American Soldier) आईला पाठवलेले पत्र 77 वर्षांनंतर त्याच्या पत्त्यावर पोहोचले आहे. हे पत्र सैनिकाच्या पत्नीने नुकतेच स्वीकारले आहे. सैनिकाने हे पत्र त्याच्या आईला दुसऱ्या महायुद्धादरम्यान (Second World War) लिहले होते. सध्या या सैनिकाची पत्नी ह्यात असून सैनिक आणि त्याच्या आईचे निधन झालेले आहे. याबाबत मिरर यूकेने वृत्त प्रकाशित केले आहे. (Soldier Letter To Mother Delivered After 77 Years)

हेही वाचा: औरंगाबादच्या औद्यागिक क्षेत्राला बूस्ट; Audi Q7 कारची होणार निर्मिती

जॉन गोन्साल्विस असे या अमेरिकन सैनिकाचे (United States Postal Service) नाव असून त्यांनी हे पत्र 6 डिसेंबर 1945 रोजी म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान आपल्या आईला लिहिले होते. तेव्हा गोन्साल्विस फक्त 22 वर्षांचा होता आणि जर्मनीत काम करत होता. मात्र, गोन्साल्विसचे हे हस्तलिखित पत्र हरवल्यामुळे त्याच्या आईपर्यंत पोहोचलेच नाही. ()

हेही वाचा: ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाइन्स

दरम्यान, गोन्साल्विस यांचे 2015 मध्ये निधन झाले. त्याआधी त्याच्या आईचाही मृत्यू झाला होता. मात्र तोपर्यंत आईला गोन्साल्विस यांचे पत्र मिळाले नव्हते. दरम्यान, USPS (युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्विस) ला गोन्साल्विसची पत्नी अँजेलिना यांचा शोध घेण्यात यश आल्याने अखेर त्यांना हे पत्र सुपुर्द करण्यात आले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर गोन्साल्विस यांची पत्नी थोडी भावूक झाली. अँजेलिना या महिन्यात तिचा ९० वा वाढदिवस साजरा करणार आहे. इतक्या वर्षांनंतर हे पत्र दिल्याबद्दल त्यांनी युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्विसचे आभार मानले आहेत. (United States Postal Service)

पत्रात नेमके काय

पत्रात लिहिले होते- "प्रिय, आई. आज तुझे दुसरे पत्र मिळाले आणि सर्व काही ठीक आहे हे ऐकून आनंद झाला. मी ठीक आहे. येथील जेवण बहुतेकदा चांगले नसते. मुलीसाठी खूप प्रेम. तुमचा मुलगा जॉन. लवकरच भेटू अशी आशा आहे.' अशा आशयाचे हे पत्र गोन्साल्विस यांनी आईला पाठविले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top