South African Variant | साऊथ अफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारतीयांनो सावधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

साऊथ आफ्रिकेतून कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारतीयांनो सावधान!

भारतात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी येणाऱ्या काळातील चिंता वाढली आहे. कारण दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने संपूर्ण जगाचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता मावळली असतानाच ही महत्वाची माहिती उघडकीस आलीय. सध्या युरोपातील काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने सर्वसामान्य होरपळून निघाले असतानाच ही बातमी येणं, म्हणजे धोक्याची घंटा आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्‍यांनी घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष्य याकडे लागलं आहे. दक्षिण अफ्रिकेच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं काटेकोरपणे टेस्टिंग करायला सांगितलं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह अन्य दोन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्हेरिएंटची ओळख पटवण्यात आली असून दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँग या देशांमधील नागरिकांसाठी धोका वाढल्याचं चित्र आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) सरकारला सूचित केल्याची माहिती दिली. यासंदर्भात त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. कोविड-19 प्रकार B.1.1529 ची काही प्रकरणे बोत्सवानामध्ये नोंदववण्यात आली आहेत. बोत्सावाना (3 प्रकरणे) , दक्षिण आफ्रिका (6 प्रकरणे) आणि हाँगकाँग (1 प्रकरण) सापडल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

हाँगकाँगमध्ये सापडलेला कोरोना व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतील आहे. दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की B.1.1529 मध्ये आढळलेलं म्युटेशन हे नवीन आहे. हा नवा व्हेरिएंट रोगप्रतिकारक प्रतिक्रिया कमी करतो आणि मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. रॉयटर्सने जोहान्सबर्गमधील एका अहवालात यासंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे.

ब्रिटनने आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने (United Kingdom) आता आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर हा निर्णय़ घेतला आहे. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा हा विषाणू धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत याचे ३० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) सहा देशांमधून उड्डाणे ब्रिटनमध्ये रद्द करण्याची घोषणा आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी केली.

ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेकडून बी १.१.५२९ हा व्हेरिअंटची तपासणी केल्यानंतर त्याला VUI घोषित करण्यात आले. यानंतरच विमान उड्डाणे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातही लवकरच उड्डाणांवर बंदी?

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहिला आहे. दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता त्याची शक्यता मावळली आहे. या दरम्यान, दक्षिण अफ्रिकेली व्हेरिएंटने पुन्हा जगाची चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य सचिन भूषण यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांबद्दल माहिती दिली.

दक्षिण अफ्रिकेच्या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन झाल्याची नोंद आहे आणि त्यामुळे अलीकडेच शिथिल केलेले व्हिसा निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाल्यामुळे देशासाठी सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं. या व्हेरिएंटचा प्रसार वाढल्यास भारतातूनही संबंधित देशांमध्ये प्रवासावर निर्बंध येऊ शकतात. तसेच या देशांमधून विमान प्रवासाला बंदी घातली जाऊ शकते.

loading image
go to top