Mikhail Gorbachev : सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन

शीतयुद्ध संपवण्यात गोर्बाचेव्ह यांचा महत्त्वाचा वाटा होता.
Mikhail Gorbachev Passes Away
Mikhail Gorbachev Passes Awayesakal
Summary

शीतयुद्ध संपवण्यात गोर्बाचेव्ह यांचा महत्त्वाचा वाटा होता.

Mikhail Gorbachev Passes Away : सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांचं मंगळवारी (30 ऑगस्ट) दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रशियन मीडिया रिपोर्टनुसार, मिखाईल गोर्बाचेव्ह हे मागील काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1985 मध्ये त्यांनी रशियाची सुत्रं स्वीकारली आणि USSR ला जगासमोर आणलं आणि मायदेशी अनेक महत्त्वाचे बदल घडवले.

Mikhail Gorbachev Passes Away
Mercedes Benz : संतोष अय्यर होणार मर्सिडीज बेंझ इंडियाचे नवे CEO

मात्र, सोव्हिएत युनियनची पडझड ते रोखू शकले नाहीत. त्यातूनच रशियाचा जन्म झाला होता. गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर संपूर्ण जगातून श्रद्धांजलीचा ओघ सुरू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुखे आँटोन गट्रेस म्हणाले, इतिहास बदलण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जगानं एक मोठा नेता, शांततेचा पुरस्कर्ता गमावला आहे." असं त्यांनी ट्विटरव्दारे श्रद्धांजली वाहिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com