esakal | अवकाश स्थानक गजबजले अंतराळवीरांनी

बोलून बातमी शोधा

Astronauts
अवकाश स्थानक गजबजले अंतराळवीरांनी
sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून (आयएसएस) अंतराळवीर विविध प्रकारचा अभ्यास करीत असतात. सध्या हे स्थानक अंतराळवीरांनी गजबजले आहे. कारण या स्थानकात ११ अंतराळवीर आहेत.

‘स्पेसएक्स’च्या ‘ड्रॅगन’ या यानातून शनिवारी (ता. २४) तेथे चार अंतराळवीर पोचले. आधीपासून तेथे सहा अंतराळवीर असल्याने त्यांची संख्या ११ झाली आहे. यात अमेरिकेचे सहा, रशियाचे दोन तर जपान आणि फ्रान्सचा प्रत्येकी एक अंतराळवीर आहे. ‘नासा’चे हंगामी प्रशासक स्टीव्ह जर्स्की यांनी ‘आयएसएसवर तुम्हा ११ जणांना पाहून छान वाटतेय’, अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘आयएसएस’वरील ११ अंतराळवीर एकत्र असणे ही दुर्मीळ बाब आहे. यापूर्वी ‘नासा’चे अंतराळ यान युग सुरू झाले होते, तेव्हा १३ अंतराळवीर या अवकाश स्थानकावर होते. नेहमी साधारण सहा अंतराळवीर तेथे असतात.

आज परतणार चार अंतराळवीर

न ‘क्रू -१’ मोहिमेअंतर्गत गेल्या नोव्हेंबरमध्ये तेथे गेलेले चार अंतराळवीर उद्या (ता. २८) पृथ्वीवर परतणार आहेत. नवे अंतराळवीर तेथे सहा महिने राहणार आहेत.