Drone image of Valencia bridge destroyed by rapid floodwaters in Spainesakal
ग्लोबल
Spain Floods: स्पेनमध्ये हाहाकार! एका वर्षाचा पाऊस 8 तासात पडला, 95 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
Spain heavy rain: स्पेनच्या पूर्वेकडील भागात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे विनाशकारी पूर आला. यामुळे अनेक शहरांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहने आणि रेल्वे मार्ग बाधित झाले आहेत.
स्पेनमध्ये मंगळवारी रात्री पूर्व भागात प्रचंड पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आठ तासांत वर्षभराच्या पावसाची सरासरी नोंद झाली. या भीषण पावसामुळे शहरांमध्ये हाहाकार उडाला असून रस्त्यांवर पाणी साचले आहे. ड्रोनच्या मदतीने मिळालेल्या फूटेजमध्ये वेलेंसिया भागातील पूल जलप्रवाहात वाहून गेला असल्याचे दिसत आहे. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत.