दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spice jet

दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग

नवी दिल्ली : दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटचे SG-11 विमानाचे कराची (Karachi) येथे इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानामध्ये तांत्रिक बिघाड (Technical Fault) झाल्यानंतर विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. दरम्यान, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. (Spice Jet Flight Emergency Landing In Karachi Pakistan)

लाईटमधील तांत्रिक बिघाडामुळे (Technical Fault) स्पाईसजेटचे विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले असून, विमान कराचीत सुखरूप उतरवण्यात आले असून, यातील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे, अशी माहिती स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिली.

लँडिंग दरम्यान कोणतीही आणीबाणीची घोषणा न करता विमान सुरक्षितपणे काराची विमानतळावर उतरवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काराची विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर प्रवाशांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली असून, दुसरे विमान लवकरच कराचीला पाठवण्यात येणार असून, या विमानाने सर्व प्रवाशांना दुबईला रवाना केले जाणार असल्याचे स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने सांगितले.

Web Title: Spicejet Sg 11 Flight From Delhi To Dubai Makes An Emergency Landing In Karachi Pakistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistandomestic flights