रशियाची लस भारतात; पण अजूनही 'लॅब टेस्ट'मध्ये पडलीय अडकून

भारतात (India) कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid 19 vaccination) मोहिम वेगाने सुरु आहे. यात आता रशियाच्या (Russia) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसही भारतात दाखल झाली आहे.
रशियाची लस भारतात; पण अजूनही 'लॅब टेस्ट'मध्ये पडलीय अडकून

नवी दिल्ली - भारतात (India) कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid 19 vaccination) मोहिम वेगाने सुरु आहे. यात आता रशियाच्या (Russia) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसही भारतात दाखल झाली आहे. लस भारतात येऊन दहा दिवस झाले तरी भारतातील पुढच्या प्रक्रियेमध्ये अडकून पडली आहे. रशियाने जेव्हा लस तयार केल्याची घोषणा केली होती तेव्हापासून स्पुटनिक व्ही लशीबाबत जगभरातून शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, आता भारतात ही लस आली असली तरी अद्याप सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. याची टेस्ट हिमाचलमधील (Himachal) एका लॅबमध्ये सुरु असून त्याचे नमुने भारतात आले आहेत. आठ दिवसांपूर्वी याची चाचणी घेण्यास सुरुवात झाली असून त्याचा अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागतील. (sputnik v arrived 1 may but still stuck lab for tests)

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसऱीकडे लशीचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण मोहिमेला वेग मिळण्यासाठी स्पुटनिक व्ही लशीची मदत होणार आहे. केंद्र सरकारने 18 वर्षे वयावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र काही राज्यांनी अद्याप 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस देण्यास सुरु केलेलं नाही. लशीच्या तुटवड्यामुळे आधीच्या टप्प्यातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

रशियाची लस भारतात; पण अजूनही 'लॅब टेस्ट'मध्ये पडलीय अडकून
आता लहान मुलांसाठीही आली कोरोना लस

कसौलीमधील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीत स्पुटनिक व्ही लशीचे नमुने पाठवण्यात आले आहेत. याठिकाणी लशीची लॅब टेस्ट केली जाणार असून त्याचा अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागतील. पुढच्या दहा दिवसात ही चाचणी पूर्ण होणं अशक्य असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लॅबला स्पुटनिक लशीचे 100 नमुने पाठवण्यात आले आहेत. लशीची कार्यक्षमता, प्रभाव आणि त्याचे दुष्परिणाम या निकषांवर चाचणी घेण्यात येणार आहे.

रशियाची लस भारतात; पण अजूनही 'लॅब टेस्ट'मध्ये पडलीय अडकून
Twitter कडून भारताला 110 कोटींची मदत

भारतात 1 मे रोजी स्पुटनिक व्ही लशीचे दीड लाख डोस आले आहेत. रशियातून हैदराबादमध्ये लशीचे डोस दाखल झाले. या लशीचे वितरण करण्यासाठी आता लॅबकडून आवश्यक मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे. ती मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर जानेवारीपासून केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com