देश सोडू नका; श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांना न्यायालयाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Prime Minister Mahinda Rajapaksa

देश सोडू नका; श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांना न्यायालयाचे आदेश

कोलंबो : श्रीलंकेत सुरू असलेल्या संकटाच्या काळात माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahindra Rajpakshe) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देश सोडून जाण्यास श्रीलंकेच्या न्यायालयाने (Sri Lanka Court) बंदी घातली आहे. श्रीलंकेत महिंदा राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर देशात हिंसाचार उसळला आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थान टेम्पल ट्रीमध्ये घुसून आग लावली. यानंतर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष हेलिकॉप्टरने त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतला आहे. परंतु, या नौदल तळालाही आंदोलकांनी वेढले आहे. (Foreign Travel Ban On Former PM Mahinda Rajapaksa )

हेही वाचा: हिंगोलीच्या कुंटुंबाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

भारतात पळून गेल्याची अफवा

दरम्यान, महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतात पळून गेल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी निवेदन जारी करत हे वृत्त फेटाळून लावले आहे. यामध्ये त्यांनी "काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेल्याच्या सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरल्या जात आहे. मात्र, हे पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

महिंदा राजपक्षेंच्या अटकेसाठी तक्रार

श्रीलंकेतील वकिलांच्या एका गटाने महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांवर हल्ले करण्यास प्रवृत्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Sri Lanka Court Bans Ex Pm Rajapaksa Leaving Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sri Lanka
go to top