भारताची पुन्हा श्रीलंकेला मदत, पाठवला 44 हजार मेट्रिक टन युरिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Crisis In Sri Lanka

भारताची पुन्हा श्रीलंकेला मदत, पाठवला 44 हजार मेट्रिक टन युरिया

Sri lanka Crisis : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेसाठी पुन्हा एकदा भारताकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला यावेळी भारत कर्ज सुविधेअंतर्गत 44,000 टनांहून अधिक युरिया पाठवला आहे . भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, ही मदत श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना मदत आणि अन्न सुरक्षा यासाठी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांची भेट घेतली आणि त्यांना 44,000 टनांहून अधिक युरियाची आवक झाल्याची माहिती दिली. भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, उच्चायुक्तांनी श्रीलंकेच्या कृषी मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना श्रीलंकेला कर्ज सुविधेच्या अंतर्गत भारताने पुरवठा केलेल्या 44,000 टनांहून अधिक युरिया बद्दल माहिती दिली.

हेही वाचा: Nokia ने भारतात लॉन्च केला स्वस्तात मस्त फोन, 3 दिवस चालेल बॅटरी

RBI ने केली मोठी घोषणा

उच्चायुक्तांनी भर देत सांगितले की भारताकडून ही मदत श्रीलंकेतील शेतकऱ्यांसह लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील नागरिकांच्या अन्न सुरक्षेसंबंधीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ही मदत करण्यात येत आहे. तत्पूर्वी, भारताच्या बाजूने मदतीचा हात पुढे करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की श्रीलंकेसोबतचे सर्व कायदेशीर व्यापार व्यवहार आशियाई क्लिअरिंग युनियन (ACU) व्यवस्थेच्या बाहेरील कोणत्याही स्वीकृत चलनात केले जाऊ शकतात.

RBI ने श्रीलंकेच्या व्यापार व्यवहारांसह सर्व पात्र चालू खात्यातील व्यवहार पुढील सूचना मिळेपर्यंत ACU व्यवस्थेबाहेर अधिकृत चलनात केले जाऊ शकतात. रिझर्व्ह बँकेने भारत-श्रीलंका व्यावसायिक बँकांना जारी केलेल्या परिपत्रकात याबद्दल माहिती दिली आहे. ही सूचना तात्काळ लागू करण्यात आली आहे. बांगलादेश, भूतान, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सध्या ACU चे सदस्य आहेत.

हेही वाचा: Viral Video: गाडीचा हॉर्न वाजला, नागोबा डुलायला लागले! एक मोरही

Web Title: Sri Lanka Crisis 44000 Metric Tonnes Of Urea Supplied To Sri Lanka Recently By India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..