'…तर रक्तपात होऊ शकतो'; श्रीलंकेच्या सत्ताधारी खासदारांचा गंभीर इशारा

Economic crisis in Sri Lanka
Economic crisis in Sri Lankaesakal

सध्या श्रीलंका गंभीर आर्थीक संकटाचा (sri lanka crisis) सामना करत आहे लोकांना जीवनावश्यक गोष्टींचा तुडवडा सहन करावा लागत आहे. या दरम्यान श्रीलंकेच्या खासदारांच्या एका गटाने देशाला दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी देशात अंतरिम सरकार स्थापनेचे समर्थन केले आहे. संसदीय बहुमताचे समर्थन असलेले अंतरिम सरकार लवकरात लवकर स्थापन न केल्यास हिंसा आणि अराजकतेचा इशारा त्यांनी दिला आहे. असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

संसदेतील बहुसंख्य नेत्यांच्या पाठिंब्याने अंतरिम पंतप्रधान निवडण्यासाठी सर्व पक्षांसोबत चर्चेचे नेतृत्व करावे असे खासदारांनी संसदेच्या अध्यक्षांना आवाहन केले. "ही समस्या सोडवण्याची पहिली अट ही आहे की, हे सरकार सोडले पाहिजे. त्याच्या जागी अंतरिम सरकार असावे," असे माजी मंत्रिमंडळ सदस्य विमल वीरावंसा यांनी मंगळवारी सांगितले.

"सरकार आणि विरोधी पक्षाचे सदस्य या नात्याने आमची जबाबदारी आहे. .. नाही तर रक्तपात होऊ शकतो," सत्ताधारी पक्षाचे आमदार विजयादासा राजपक्षे म्हणाले, आणि इशारा दिला की, "जर असे झाले तर तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्याला जबाबदार असाल."

225 सदस्यीय संसदेत सत्ताधारी आघाडीने 40 हून अधिक खासदारांचा पाठिंबा गमावला आणि अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचे सरकार आणखी अडचणीत सापडले यानंतर खासदारांकडून असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान श्रीलंकेच्या अध्यक्षांनी ते पद सोडणार नाहीत आग्रह धरला आहे. परंतु 113 जागा (सर्वसाधारण बहुमत) असलेल्या पक्षाकडे सरकार सोपवण्याची ऑफर दिली आहे, असे स्थानिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Economic crisis in Sri Lanka
ED कारवाईनंतर राऊतांना उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा फोन

दरम्यान विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे आणि राजपक्षे यांच्या 'युनीटी सरकार' म्हणजेच सर्व पक्षाचे सरकार हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. सर्वात मोठा पक्ष - SJB चे नेते सजीथ प्रेमदासा म्हणाले की, आपण सामान्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. सरकारने गेले पाहीजे आणि राष्ट्रपतीपासून सुरुवात केली पाहिजे.

SJB कडे 54 जागा आहेत. या संकटापूर्वी सत्ताधारी आघाडीचे जवळपास 150 जागांवर नियंत्रण होते परंतु डझनभर नेते बाहेर पडल्याने ते स्वतंत्र आमदारांवर अवलंबून राहिले आहे. तत्पूर्वी आज श्रीलंकेने 48 तासांत आपला दुसरा अर्थमंत्री गमावला आहे. अध्यक्षांचे भाऊ बासिल राजपक्षे यांना काढून टाकल्याच्या एका दिवसानंतर अली सबरी यांनी देखील राजीनामा दिला आहे

Economic crisis in Sri Lanka
'तुम्हाला एडिट बटण हवंय का?'; एलन मस्कच्या पोलवर CEO अग्रवाल म्हणाले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com