श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार, म्हणाले… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri lanka ex pm ranil wickremesinghe thankful to india for help amid economic crisis

श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार, म्हणाले…

श्रीलंकेतील सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी हजारो निदर्शक श्रीलंकेच्या रस्त्यावर उतरले. देशात अन्नधान्याच्या वाढत्या किमती, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यामुळे, देश दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटाशी झुंजत असताना लोकांना मोठ्या आडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी आर्थिक संकटात मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. भारताने आम्हाला सर्वाधिक मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारची चीनशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कठीण काळातून जात असलेल्या श्रीलंकेला भारत सरकारने अलीकडेच इंधनाची खेप पाठवली आहे. याशिवाय एप्रिलमध्ये आणखी पाठवण्यात येणार आहे. देशातील परिस्थिती इतकी बिकट होत चालली आहे की नागरिक जिवनावश्यक गोष्टींसाठी जीव धोक्यात घालत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात माजी पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राजधानी कोलंबोमधून भारतासाठी संदेश जारी केला. ते म्हणाले, 'मला वाटते की भारताने आम्हाला सर्वात जास्त मदत केली आहे. ते आपल्याला गैर-आर्थिक मार्गानेही मदत करत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणूनच आम्ही त्याचे ऋणी आहोत.

हेही वाचा: Google ने प्ले स्टोअरवरून काढले हे 6 धोकादायक ॲप्स; लगेच करा डिलीट

त्यांनी माहिती दिली की, सरकारने चीनकडून गुंतवणुकीची मागणी केली होती, मात्र तसे झाले नाही. "या सरकारच्या काळात कोणतीही मोठी चीनी गुंतवणूक झालेली नाही," असेही ते म्हणाले. "त्यांनी गुंतवणुकीची मागणी केली होती, पण गुंतवणूक आली नाही... कर्जाची परतफेड करण्यासाठी रीशेड्युल करण्यावर चर्चा सुरू आहे. त्यांनी चिनी सरकारशी बोलणी केली आहे, एवढंच मला माहीत आहे." असे त्यांनी सांगितले. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, भारताने आतापर्यंत 2 लाख 70 हजार मेट्रिक टन इंधन श्रीलंकेला पाठवले आहे. याशिवाय भारताने श्रीलंकेला क्रेडिट लाइनमध्ये देखील विस्तार केला आहे.

हेही वाचा: शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी राज्यपालांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान नागरिक रस्त्यावर उतरून सरकारचा तीव्र निषेध करत आहेत. ते अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या प्रशासनावर आर्थिक संकट योग्यरित्या न हाताळल्याचा आरोप करत आहेत. अनेक महिन्यांपासून श्रीलंकेचे लोक इंधन, गॅस, अन्न आणि औषधे खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे आहेत. इंधनाअभावी तासनतास वीजपुरवठा खंडित होतो. गॅस किंवा रॉकेल घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहून किमान 4 वृद्धांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा: Hero Splendor : हिरो स्प्लेंडर भारतात महागली; जाणून घ्या नवीन किंमती

Web Title: Sri Lanka Ex Pm Ranil Wickremesinghe Thankful To India For Help Amid Economic Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global news
go to top