
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे राजीनामा देण्याची शक्यता
कोलंबो : श्रीलंकेतील दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विनंतीनंतर पदाचा राजीनामा देण्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजत आहे. राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत, महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास सहमती दर्शवली आहे. महिंदा राजपक्षे सोमवारी एका विशेष निवेदनात त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असून, पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे आहेत, असे वृत्त कोलंबो पेजने दिले आहे. (Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa Likely To Resign)
दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी मान्य केले होते की, लोकांच्या तीव्र निषेधादरम्यान देशातील आर्थिक आणि राजकीय संकटाचे व्यवस्थापन करणे एक गंभीर समस्या बनली आहे, असे कोलंबो पेजने वृत्त दिले आहे. श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री, प्रसन्ना रणतुंगा, नालाका गोदाहेवा आणि रमेश पाथिराना या सर्वांनी महिंदा राजपक्षे यांच्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. तर दुसरीकडे मंत्री विमलवीरा दिसानायके यांनी महिंदा यांचा राजीनामा देशाच्या संकटाचा सामना करण्यासाठी व्यर्थ ठरेल असे मत व्यक्त केले आहे.
Web Title: Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa Likely To Resign
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..