उभे राहा आणि वजन कमी करा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 November 2019

दिवसातून केवळ दोन तास उभे राहिल्याने या समस्येचे निवारण होऊ शकते असा दावा व्हीएलसीसीच्या अध्यक्ष वंदना ल्युथर यांनी केला आहे.

मुंबई : दैनंदिन जीवनातील ताण तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्येला प्रत्येकालाच तोंड द्यावे लागत आहे. दिवसातून केवळ दोन तास उभे राहिल्याने या समस्येचे निवारण होऊ शकते असा दावा व्हीएलसीसीच्या अध्यक्ष वंदना ल्युथर यांनी केला आहे.

भारतीयांच्या जीवनातील हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्हीएलसीसीच्या माध्यमातून लवकरच स्टॅंडअप इंडिया ही मोहीम येत्या 26 नोव्हेंबर पासून राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले, लोकांना आपल्या लठ्ठपणामुळे विविध आजार आणि अडचणींना सामोरे जावे लागते, त्यासाठी उभे राहणे हा उत्तम उपाय असल्याचे त्या म्हणाल्या,  केवळ आहाराची पध्दती आणि पदार्थ बदलून अथवा टाळून चालणार नाही. साखर, तेल तुप टाळले तरी खूप फरक पडेल असेही त्या म्हणाल्या. यासाठी शाळांमधून आणि पालकांच्या जागृतीने ही मोहीम राबवली जाणार आहे.

व्ही एल सीसीचे भारत आणि नेपाळमध्ये 96 वेलनेस सेंटर असून महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये 37 सेंटर्स आहेत, तर येत्या वर्षभरात महाराष्ट्रात आणखी आठ ठिकाणी सेंटर उभारले जाणार आहेत, यात यवतमाळ,धुळे, रत्नागिरी, नांदेड, वाशिम, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, सातारा,वर्धा आणि सोलापूर याठिकाणी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत, 

web title : Stand up and lose weight


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stand up and lose weight