'प्रेषितांच्या नावावर जो कोणी क्रौर्य करेल त्याला माफी नाही!' | Global | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IMRAN KHAN
'प्रेषितांच्या नावावर जो कोणी क्रौर्य करेल त्याला माफी नाही!'

'प्रेषितांच्या नावावर जो कोणी क्रौर्य करेल त्याला माफी नाही!'

पाकिस्तानातील (Pakistan) सियालकोटमध्ये एका श्रीलंकन (Srilanka) नागरिकाला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेवर जगभरातून टीका होत आहे. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी सांगितले की, प्रेषित पैगंबरांच्या (Mohammad Paigambar) नावाखाली कोणत्याही प्रकारच्या क्रौर्याला शिक्षा दिली जाईल. पाकिस्तानमध्ये श्रीलंकन मॅनेजरच्या मॉब लिंचिंगनंतर (Mob Lynching) इम्रान खान यांचे हे वक्तव्य आले आहे.

हेही वाचा: कुतुब मिनारपेक्षाही उंच 'या' खत कारखान्याची उंची!

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका कारखान्यातील कामगारांच्या जमावाने श्रीलंकन व्यवस्थापकावर हल्ला केल्याने त्याला जाळण्यात आले. त्याच्यावर ईशनिंदा केल्याचा आरोप करून हे क्रूर कृत्य करण्यात आले. या घटनेमुळे पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे काही मोठे मौलवी इस्लामाबादमधील श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयात शोक व्यक्त करण्यासाठी पोचले.

मुस्लिमबहुल पाकिस्तानमध्ये नेहमीच ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाकडून हत्या होत असतात. तर पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या आरोपात मृत्युदंडाचीही तरतूद आहे. दुसरीकडे, इम्रान खान म्हणाले, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी ठरवले आहे, यापुढे कोणीही धर्माच्या नावावर, विशेषत: पैगंबरांच्या नावावर क्रौर्य करेल, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला माफ केले जाणार नाही.

'तो' एक लाजिरवाणा दिवस

तत्पूर्वी, या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की, सियालकोटमधील कारखान्यावर झालेला भीषण हल्ला आणि श्रीलंकेच्या व्यवस्थापकाला जिवंत जाळणे हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस आहे.

हेही वाचा: चिनी विमानांची तैवानमध्ये पुन्हा घुसखोरी! प्रत्युत्तरानंतर काढला पळ

काय आहे घटना?

पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एका श्रीलंकन नागरिकाला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण करण्यात आली. श्रीलंकेचे प्रियंथा दियावदना कुमरा ही सियालकोट येथील एका कपड्याच्या कारखान्यात निर्यात व्यवस्थापक म्हणून काम करत होते. कारखान्यातील कामगारांनी या व्यक्तीवर प्रेषित मोहंमद यांचे नाव असलेले पोस्टर्स फाडल्याचा आरोप केला आहे. यानंतर कारखान्यातील कामगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रियंथा दियावदना यांना बेदम मारहाण करण्यात आली. श्रीलंकेचा व्यवस्थापक जमावाच्या या हल्ल्यात मारला गेला, तेव्हा त्याचा मृतदेहही दंगलखोरांच्या जमावाने जाळला होता.

टॅग्स :Pakistanimran khan