Hanuman Jayanti : हनुमान जयंतीत जागतिक गजर; ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ मधून भारतीय संस्कृतीची ताकद

Hindhu Culture Symbol : अमेरिकेतील ह्युस्टन शहरात उभारलेली ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ ही ९० फूट उंच भगवान हनुमानाची मूर्ती केवळ धार्मिक प्रतीक नसून भारताच्या सांस्कृतिक सॉफ्ट पॉवरचे प्रभावी उदाहरण म्हणून समोर आली आहे.
Hindu culture global presence

Hindu culture global presence

sakal

Updated on

हनुमान जयंतीच्या निमित्ताने हजारो किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेतील ह्युस्टन शहरात उभा असलेला ९० फूट उंच भगवान हनुमानाचा विराट अवतार आज भारतीय श्रद्धेचा जागतिक गजर ठरला आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन म्हणून ओळखली जाणारी ही भव्य मूर्ती केवळ धार्मिक प्रतीक नसून, भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचा आणि ‘एकते’च्या संदेशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेला ठसा आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही मूर्ती जणू मायभूमीशी जोडणारा भावनिक दुवा ठरत आहे, तर जागतिक समाजासाठी ती विविधतेतून एकतेचा संदेश देणारी प्रेरणास्थान बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com