महान संशोधक स्टीफन हॉकिंग, वय ७६ यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

केंब्रिज - महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले.

केंब्रिज - महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले.

वयाच्या २१ व्या वर्षी हॉकिंग यांना मोटर न्यूरॉनची व्याधी जडल्याचे निदान झाले. त्यावेळी डॉक्टरांनी हॉकिंग फार तर दोन वर्षे जगू शकतील, असा अंदाज वर्तविला होता. पण हॉकिंग यांना झालेला रोग डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेगाने शरीरात पसरला. त्यामुळे १९६३ मध्ये दोन वर्षांची मुदत मिळालेले स्टीफन हॉकिंग त्यानंतर जवळपास ५० वर्षे जगले. नुसतेच जगले नाहीत, तर खुर्चीला खिळून बसावे लागले असले, तरीही विज्ञानात मोलाचे योगदानही दिले.

रॉजर पेनरोज यांच्यासोबत केलेले ब्लॅक होलसंदर्भातील संशोधनापासून क्वांटम मेकॅनिक्समधील थिअरी मांडण्यापर्यंत डॉ. हॉकिंग यांनी जागतिक विज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stephen Hawking died at 76 Cambridge