स्टीव्ह जॉब्स यांच्या पहिल्या जॉब अ‍ॅप्लिकेशनची तब्बल २.५ कोटींना विक्री

हा एक पानी अर्ज जॉब्स यांनी १९७३ मध्ये लिहिला होता.
Steve Jobs
Steve Jobs

'अ‍ॅपल'चे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात नोकरीसाठी केलेल्या अर्जाचा चौथ्यांदा लिलाव झाला आहे. हा एक पानी अर्ज जॉब्स यांनी १९७३ मध्ये लिहिला होता. त्यावेळी जॉब्स हे १८ वर्षांचे होते. आता हा अर्ज तब्बल अडीच कोटी रुपयांना विकला गेला आहे. तब्बल चार दशकांपूर्वीच्या या अर्जातून स्टीव्ह जॉब्स यांची तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करण्याची जिद्द दिसून येते. २०१७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा नोकरीचा हा अर्ज लिलाव करण्यात आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये दुसऱ्यांदा आणि या वर्षी मार्चमध्ये तिसऱ्यांदा त्याचा लिलाव पार पडला. (Steve Jobs first and only job application sold for a whopping amount slv92)

नोकरीतील अर्जात विशेष क्षमता म्हणून त्यांनी आपण टेक किंवा डिझाईन इंजीनिअर आहोत, असं म्हटलं आहे. त्यांनी हेवीट्ट पॅक्कर्ड या कंपनीच्या नावाचाही उल्लेख केला आहे. ही कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या अर्जामध्ये जॉब्स यांनी नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत, याचा मात्र उल्लेख केलेला नाही. पत्ता म्हणून "रिड कॉलेज'चा उल्लेख केला आहे. काही काळ त्यांनी ओरेगॉन महाविद्यालयामध्येही धडे गिरवले होते, असे बोस्टनमधील लिलाव करणाऱ्या आर. आर. ऑक्‍शन या संस्थेने निवेदनामध्ये म्हटले होते. जॉब्स यांचा हा अर्ज यावेळी फक्त कागदपत्राच्या रुपातच नाही तर नॉन-फंजिबल टोकन (NFT) रुपातही विकला गेला आहे.

स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर, निर्णय क्षमतेवर, अॅपल कंपनीला जगभरातील एक प्रीमिअम बँड बनवला. अ‍ॅपलला लोकप्रियतेच्या आणि आर्थिक सक्षमतेच्या शिखरावर पोहोचवून स्टीव्ह जॉब्स यांनी ५ ऑक्टोबर २०११ रोजी जगाचा निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com