Stone River : जगातील एकमेव नदी जिथे पाण्याऐवजी वाहतात दगड

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही
Stone River
Stone Riveresakal

Stone River : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. ही रहस्ये अशी आहेत की त्यांची उकल विज्ञानालाही करता आलेली नाही. अशी एक रहस्यमय नदी आहे, जिथे पाण्याऐवजी दगड आहेत. ऐकल्यानंतर तुम्हालाही विश्वास ठेवणे कठीण जाईल, परंतु नदीत पाण्याऐवजी दगड आहेत. शास्त्रज्ञांनाही या स्टोन रिव्हरबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही.

Stone River
Fashion Tips: ऑफिसमध्ये परफेक्ट स्टायलिश लूक हवाय? मग, या टिप्स नक्की फॉलो करा...

मात्र, ही नदी निसर्गाच्या कोणत्याही महान आश्चर्यापेक्षा कमी नाही. स्टोन रिव्हरमध्ये सुमारे 6 किलोमीटरपर्यंत फक्त दगडच दिसतील. हा दगड नदीच्या प्रवाहासारखा दिसतो. वास्तविक, ही नदी रशियामध्ये आहे जिथे मोठ्या प्रमाणात जड दगड आहेत.

Stone River
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

स्टोन रिव्हरमध्ये 10 टन वजनाचा दगड

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या नदीत पाण्याचा थेंबही नाही. इथे तुम्हाला फक्त दगड बघायला मिळतील. या नदीत छोटे ते मोठे दगड आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथे 10 टन वजनाचे दगड सुमारे 6 इंचांपर्यंत बुडालेले आहेत. त्यामुळेच इथे झाडे उगवत नाहीत. विशेष म्हणजे नदीच्या आजूबाजूचे वातावरण अतिशय हिरवेगार आहे.

Stone River
Water for Health : आरोग्यदायी शरीरासाठी हवे पाण्याचे योग्य प्रमाण

नदीत दगड कसे आले

या नदीविषयी ऐकून तुमच्या मनात असाच विचार येत असेल की या नदीत पाण्याच्या जागी दगड कसे आले? काही लोक याला निसर्गाचा चमत्कार मानत आहेत. आजूबाजूचे वातावरण पाहता या नदीत पाण्याचा थेंबही नसेल असे अजिबात वाटत नाही. पण नदीतील दगडांबाबत शास्त्रज्ञांचा स्वतःचा सिद्धांत आहे.

Stone River
हिमोग्लोबिन वाढवणारा आहार! Health Tips

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे दगड 10,000 वर्षांपूर्वी हिमनद्या तुटल्यामुळे उंच शिखरांवरून पडले असावेत, आणि ही नदी तयार झाली असावी.मात्र, कारण काहीही असो, स्टोन रिव्हरने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजही ही नदी वैज्ञानिकांसाठी एक मोठं न उलगडलेलं कोडं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com