Lockdown News | सावधान...'या' देशात पुन्हा लॉकडाऊन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

सावधान...'या' देशात पुन्हा लॉकडाऊन!

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सर्वजण कडक लॉकडाऊनमध्ये होते. जवळपास ५ महिन्यांच्या पहिल्या फेजनंतर सरकारने काही आस्थापनांसाठी नियम शिथील केले. सध्या जगातील विविध देशांमध्ये कोरोना कमी झाल्याचं दिसतंय. भारतात परिस्थिती आवाक्यात येत आहे. मात्र चीनमध्ये कोविडचा उद्रेक पुन्हा वाढलाय. तर, फ्रान्समध्ये कोरोना नुकताच नियंत्रणात येत आहे. अशातच जगातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आली आहे. यामध्ये युरोपला मोठा फटका बसतोय.

युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ऑस्ट्रियाचे चान्सेलर यांनी घोषणा केली. येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. चान्सेलर अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी शुक्रवारी संबंधित माहिती दिली.

सोमवारपासून, देशात राष्ट्रीय लॉकडाऊन लावणार असून ते जास्तीत जास्त 20 दिवसांसाठी लागू होईल, असं त्यांनी म्हटलं. दर 10 दिवसांनी एक मूल्यांकन केलं जाईल. मूल्यांकनाचं काम 13 डिसेंबरनंतर आपोआप संपेल. त्या दिवसापासून लसीकरण झालेल्या आणि बरे झालेल्या रुग्णांसाठी लॉकडाऊन संपेल, असं अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी म्हटलं.

loading image
go to top