चार महिन्यांनंतर शाळेत परतले विद्यार्थी;जगाची स्थिती पूर्ववत होण्याकडे पहिले पाऊल

Students return to school after four months; first step towards reversing world conditions
Students return to school after four months; first step towards reversing world conditions
Updated on

बीजिंग (चीन):  चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे जानेवारीपासून बंद असलेल्या  प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आल्या आहेत. तरी, केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच या शाळांमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरुन त्या विद्यार्थ्यांना  हायस्कूल आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेची तयारी करता येऊ शकेल . यावर्षी हायस्कूल आणि विद्यापीठांची प्रवेश परीक्षा 7 आणि 8 जुलै रोजी घेण्यात येणार आहेत.


चार महिन्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले:

चीनमध्ये 25 जानेवारी पर्यंत चिनी नवीन वर्ष (लुनार वर्ष) साजरा करण्यासाठी शाळांमध्ये सुटी होती. कोरोनाच्या  उद्रेकानंतर शाळेच्या सुट्टी नंतर वाढविण्यात आल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण चीनमधील शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद होती. कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतर चीनमध्ये आता  हळूहळू सर्वकाही सामान्य होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.चीनच्या  शिक्षण मंत्रालयाचे संचालक वांग डेंगफेंग म्हणाले की देशातील बहुतेक प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या  फक्त शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.

मुलांना मनोवैज्ञानिक समुपदेशन:

आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांना मनोवैज्ञानिक समुपदेशन सुविधा देण्याचे आदेशही शाळांना देण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाचे संचालक वांग डेंगफेंग यांनी दिली. वांग यांनी मात्र किती शाळा उघडल्या हे स्पष्ट केलेले नाही. शाळा बंद झाल्याने किती मुलांवर परिणाम झाला याचीही माहिती त्यांनी दिली नाही. सरकारी टेलिव्हिजन सीजीटीएनच्या म्हणण्यानुसार, एकट्या राजधानी बीजिंगमध्ये जवळपास 49,000 हायस्कूलचे विद्यार्थी सोमवारी शाळेत आले होते. हे विद्यार्थी चीनमध्ये महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेशासाठी सध्या तयारी करत आहेत. 

सध्या चीनमध्ये काय परिस्थिती:
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी संध्याकाळी दिलेल्या माहितीप्रमाणे देशात कोरोनाच्या तीन नवीन संक्रमणाची नोंद झाली आहे. यातील दोन चिनी नागरिक परदेशातून परत आले आहेत. एक प्रकरण स्थानिक संसर्गाचे आहे. चीनमध्ये आज सुद्धा नवीन सहा संक्रमणाची नोंद झाली आहे. चीनमध्ये एकूण 82,836 कोरोना रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली असून कोरोनामुळे 4633 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या 648 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील केवळ 50 रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. चीनमध्ये आतापर्यंत 77,555 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com