कॅन्सरग्रस्त गुरूसाठी शिष्यांचेही मुंडन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

आर्कान्सातील विद्यार्थ्यांची अनोखी गुरूदक्षिणा

बेट्सविले : अमेरिकेच्या आर्कान्सा येथील लिओन महाविद्यालयातील फुटबॅाल संघाच्या खेळाडूंनी अनोख्या प्रकारे गुरूदक्षिणा दिली. त्यांच्या संघाचे प्रशिक्षक क्रिस स्वीट यांना कर्करोग झाल्याने त्यांना केमो थेरपी द्यावी लागली. मात्र यात त्यांच्या डोक्यावरील सर्व केस काढावे लागले होते.

त्यानंतर क्रिस त्यांच्या केबिनमध्ये बसले असताना एक एक करत सर्व मुंडन केलेले खेळाडू त्यांच्यासमोर येऊ लागले. त्यावेळी भारावून गेलेले क्रिस सर्व विद्यार्थ्यांना मिठी मारत होते. तेव्हाचा भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

क्रिस यांना कॅन्सर झाला असून याचे निदान जुलैमध्ये झाले. दरम्यान या सर्वाचा त्यांच्या संघाच्या खेळावर परिणाम होऊ नये यासाठी क्रिस यांनी याबद्दल कोणालाच कळू दिले नाही. मात्र आगस्टमध्ये केमोच्या उपचारादरम्यान केस गळू लागल्याने त्यांना मुंडन करावे लागले. त्यांच्या विद्यार्थ्यांना नंतर ही धक्कादायक बातमी कळली.

तेव्हा त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांनी आपल्या गुरूसाठी स्वतःच मुंडन करण्याचा निर्णय घेतला. क्रिस स्वीट कधीही हार मानत नाहीत, त्याच निर्धाराने कॅन्सरशी लढण्याचे बळ त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students shaved for there teacher who has cancer