कोरोनाच्या जनुकांच्या पृथक्करणास यश

Genes
Genes

लंडन - कोरोनावरील परिणामकारक औषध आणि लस विकसीत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास चालना मिळेल अशी मजल संशोधकांनी मारली आहे. कोरोना रुग्णांचे जगभरातील साडेसात हजारहून जास्त नमुने अभ्यासण्यात आले असून विषाणूच्या जनुकाचे पृथक्करण करण्यात आले आहे.

कोविड-१९ विषाणूत रुपांतरीत होणारे सार्स-सीओव्ही २ या विषाणूतील आनुवंशिक उत्परीवर्तनाचे सुमारे दोनशे प्रकार निश्‍चित  करण्यात आले. या अभ्यासामुळे विषाणूतील जनुकांच्या समूहाच्या (जिनोम) वैविध्याच्या प्रकारांचे वैशिष्ट्य नक्की करता आले. त्यातून माणसाला संसर्ग होण्यासाठी कसे पूरक बदल आणि उत्क्रांती होते हे दिसून आले.

उगम २०१९च्या अखेरीसच 
सार्स-सीओव्ही २ विषाणूंचा पूर्वज एकच आहे आणि गतवर्षाच्या अखेरीस कोरोनाचा विषाणू प्राण्यांमधून माणसांत आला. यावरून कोविड-१९ हा विषाणू आधीपासून माणसांमध्ये नव्हता असा ठाम मतप्रवाह असणाऱ्यांना या अभ्यासामुळे दुजोरा मिळाला आहे. विषाणूचा उमग २०१९च्या अखेरीसच झाल्याचे व त्यानंतरच वेगाने प्रादुर्भाव झाल्याचे संकेत मिळाले.

उत्परिवर्तनाबाबत संकेत नाहीत 
युसीएलचे व्याख्याता फ्रँकॉईस बॅलॉक्स यांनी सांगितले की, सर्व विषाणू नैसर्गिकरित्या उत्परीवर्तन करतात. त्यांच्यातच होणारे उत्परिवर्तन ही काही वाईट गोष्ट नसते. सार्स-सीओव्ही २ या विषाणूचे अपेक्षेपेक्षा वेगाने किंवा संथ गतीने उत्परिवर्तन होत असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. हा विषाणू कमी किंवा जास्त प्रमाणात विघातक आणि संसर्गजन्य ठरतो आहे का हे आम्ही नेमके सांगू शकत नाही.

औषधाच्या आघाडीवर 
बॅलॉक्स यांच्या मते विषाणूने उत्परिवर्तन केल्यास औषध किंवा रस परिणामकारक ठरत नाही. हेच या आघाडीवरील मोठे आव्हान असते. हेच विषाणूचा उत्परिवर्तन करण्याची कमी शक्यता असलेला भाग घेऊन त्यावर लक्ष केंद्रित केल्यास दीर्घकालीन पातळीवर परिणामकारक ठरणारे औषध विकसित करण्याची जास्त संधी असते. विषाणू सहजतेने चुकवू शकणार नाही असे औषध तयार करण्याची गरज असते.

दृष्टिक्षेपात 

  • संसर्ग, अनुवंशशास्त्र आणि उत्क्रांती या विषयावरील मासिकात शोधनिबंध प्रसिद्ध
  • ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (युसीएल) या संस्थेच्या संशोधकांचा सहभाग
  • एकापेक्षा जास्त वेळा झालेल्या आनुवंशिक उत्परिवर्तनाचे (जेनेटिक म्युटेशन) १९८ प्रकार आढळून आले 
  • त्यातून जागतीक साथित रूपांतर झालेल्या विषाणूने संसर्गास अनुरूप व अनुकूल बदल कसे केले असावेत याचे संकेत
  • बहुतेक देशांत संसर्गजन्य रोगास कारणीभूत एकाच विशिष्ट रुग्णाचा (पेशंट झिरो) अभाव
  • त्यातून जागतिक पातळीवरील साथीची सुरवातीलाच मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे संकेत
  • किरकोळ आनुवंशिक बदल, उत्परिवर्तनाचे जनुकांच्या समूहातील प्रमाण समान नाही 
  • सार्स-सीओव्ही २ या विषाणूचे जागतिक पातळीवरील आनुवंशिक वैविध्य कोरोना जागतीक साथीचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या देशांतील रुग्णांच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com