कोड्यांचे गॉडफादर, सुडोकूचे निर्माते माकी काजी यांचं निधन

पेपर, मॅगझिन किंवा इंटरनेटवरुन सुडोकूची कोडी कधी न कधी तुमच्यापर्यंत पोहोचली असतील.
कोड्यांचे गॉडफादर, सुडोकूचे निर्माते माकी काजी यांचं निधन

टोक्यो: पेपर, मॅगझिन किंवा इंटरनेटवरुन (internet) सुडोकूची कोडी कधी न कधी तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. संपूर्ण जगामध्ये आजही १० कोटी लोक नियमितपणे ही कोडी सोडवतात. काल याच सुडोकूचे (Sudoku) गॉडफादर माकी काजी (Maki Kaji) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी कर्करोगाने (Cancer) निधन झाले. कोडी बनवणारा आणि प्रकाशक म्हणून माकी काजी यांची ओळख होती. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने माकी काजी यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

त्यांनी जपानी विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडले होते. कोड्याचा पेपर काढण्याआधी त्यांनी एका प्रिंटिंग कंपनीत नोकरी केली होती. त्यांनी सुडोकूच्या माध्यमातून कोडी पहिल्यांदा जगासमोर आणली. सुडोकूचे गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माकी काजी यांना जगभरातील कोडी सोडवणाऱ्यांकडून भरपूर प्रेम मिळाले, असे त्यांची कंपनी निकोलीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.

कोड्यांचे गॉडफादर, सुडोकूचे निर्माते माकी काजी यांचं निधन
Inside Story: भारतीय स्टाफला काबूल एअरपोर्टपर्यंत कसं आणलं?

सुडोकू दोन दशकापूर्वी जापानाबाहेर लोकप्रिय झाला. परदेशी वर्तमानपत्रामध्ये ही कोडी प्रसिद्ध व्हायची, त्यामुळे सुडोकूला जगभरात ओळख मिळाली. माणसाच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी तसेच ती वाढवण्याच्या दृष्टीने सुडोकूकडे पाहिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com