अफगाणिस्तानमध्ये स्फोटात 18 जण ठार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात जलालाबाद येथे गव्हर्नर हाउस परिसरात रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात ईदची सुटी साजरी करणाऱ्या 18 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, तालिबानने शस्त्रसंधी सुरू ठेवण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी जाहीर केलेल्या एकतर्फी शस्त्रसंधीला सहकार्य करण्याचे आवाहन तालिबानला केले होते. 

काबुल : अफगाणिस्तानच्या पूर्व भागात जलालाबाद येथे गव्हर्नर हाउस परिसरात रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात ईदची सुटी साजरी करणाऱ्या 18 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, तालिबानने शस्त्रसंधी सुरू ठेवण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी जाहीर केलेल्या एकतर्फी शस्त्रसंधीला सहकार्य करण्याचे आवाहन तालिबानला केले होते. 

जलालाबादच्या ननगरहर प्रांताच्या गव्हर्नर कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. घटनास्थळाहून भारतीय दूतावासाचे कार्यालय जवळच होते. शस्त्रसंधीचा फायदा घेत तालिबानचे काही दहशतवादी काबूलसह देशातील अन्य भागांत घुसल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. कालच्या स्फोटात 18 जण मृत्युमुखी पडले असून, 49 जण जखमी झाले आहेत. आत्मघाती पथकातील दहशतवादी हा पायी आला होता. त्याने गव्हर्नर कार्यालय परिसरात ईदच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन परतणाऱ्या स्थानिक नेते आणि नागरिकांना लक्ष्य ठेऊन स्फोट घडवून आणला. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide attack in Afghanistan's Nangarhar kills at least 18