सुषमा स्वराज यांचे विमानतळावर 'या' देशाने केले जोरदार स्वागत

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

दोन दिवसांच्या बहारिन दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे बहारिन सरकारतर्फे जोरदार स्वागत झाले. स्वराज यांचे स्वागत विमानतळावर परराष्ट्रमंत्री शेख खालिद बिन अहमद बीन मोहंमद बीन खलिफा यांनी केले. दरम्यान, स्वराज यांनी पंतप्रधान खलिफा बीन सलमान यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. 

मनामा (बहारिन) : दोन दिवसांच्या बहारिन दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे बहारिन सरकारतर्फे जोरदार स्वागत झाले. स्वराज यांचे स्वागत विमानतळावर परराष्ट्रमंत्री शेख खालिद बिन अहमद बीन मोहंमद बीन खलिफा यांनी केले. दरम्यान, स्वराज यांनी पंतप्रधान खलिफा बीन सलमान यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. 

सुषमा स्वराज यांचा हा तिसरा बहारिन दौरा आहे. सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्री शेख खालिद यांच्यासमवेत दुसऱ्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषविणार आहेत. उच्च संयुक्त आयोगाची पहिली बैठक नवी दिल्लीत 2015 रोजी झाली होती. बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की जगभरात विखुरलेल्या भारतांशी जेव्हा मी भेटते तेव्हा त्यांचा पासपोर्ट पाहते. त्यांचा धर्म, समाज, राज्य या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. जर, आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असेल, तर संपूर्ण जगभरात हा पासपोर्ट आपल्याला सुरक्षा प्रदान करेल.

बहारिनमध्ये साडेतीन ते चार लाख भारतीय असून, ही संख्या बहारिनच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश इतकी आहे. त्यानंतर स्वराज यांनी पंतप्रधान खलिफा बीन सलमान यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. यादरम्यान स्वराज यांनी बहारिनमध्ये दूतावास परिसराचे उद्‌घाटन केले. संयुक्त आयोगाच्या बैठकीत व्यापार, गुंतवणूक आणि दहशतवादविरोधी सहकार्य या मुद्‌द्‌यावर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushma swaraj welcoming at airport in baherin